मारेगाव : तालुक्यात आत्महत्याची धग कायम दिसून येत आहे, नवरगाव धरण येथील घटना ताजी असताना आता धामणी येथे एका व्यक्तीने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आज शनिवार ला सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
श्रीराम आत्माराम शिवरकर (55) रा.धामणी, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.त्यांनी गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात गळफास घेतला.
श्रीराम हे गेल्या अनेक दिवसापासून आजारपणात होते,ते नागपूर तर कढी सावंगी (मेघे) येथे उपचार घेत असल्याचे समजते. ते आजाराने त्रस्त असल्याने त्यांनी जीवनाचा शेवट केला असावा असा कयास लावला जात आहे.
मात्र,श्रीराम यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप तरी अस्पष्ट आहे. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला. मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार असून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.