वणी : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी साडेसहा वा. सुमारास वणी-कायर मार्गांवर घडली. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमर रतन करसे (अं. वय 45) रा. सेवानगर ता, वणी असं अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अमर करसे हे झरी (जामणी) रुग्णालय येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते, ते कर्तव्य आटपून घरी परतत असतांना वणी-कायर मार्गांवरील एका बिअर बार जवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चक्क्याखाली चिरडून भीषण अपघात झाला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने करसे कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
मृतक अमर त्यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.पोलिस या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहे.