लोहार समाज संघटना तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नुकताच उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वणी शहरातील लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

नुसाबाई चोपणे विद्यालयाची विद्यार्थिनी कु. रूपाली प्रविणा दशरथ गिरटकर हिने 90.40 टक्के गुण घेत प्रावीण्य मिळविले आहे तसेच लाॅयंस काॅंव्हेंट चे विद्यार्थी सारांश शितल जयंत गाताडे 74 टक्के व अनुष्क शितल जयंत गाताडे 73.60 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. 

लोहार समाज संघटना वणी तर्फे समाजातील या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या गेल्या. या अनुषंगाने पालकांनी संघटनेचे आभार मानले आहेत. यावेळी बंडू निंदेकर, नितीन धाबेकर, शिरीष क्षिरसागर, जयंत गाताडे, राहुल चट्टे, रवी गाताडे, संदिप वाघाडे, प्रशांत सोनटक्के, संतोष सावरकर, निलेश सोनटक्के, आकाश खंडाळकर व नामदेव गिरटकर व परीवार उपस्थित होता.

दुचाकीला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : करंजी-मारेगाव या राज्य महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.20) रोज शुक्रवारला 4 वाजताच्या सुमारास घडली.

अमित भास्कर दर्वे (वय अंदाजे 24 वर्षे) रा.महागाव (सिंधी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहेत. अमित हा आज सकाळी महागाव येथून काही कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आला होता. तेथील काम आटोपून तो दुपारी चार वाजता सुमारास स्वगावी महागाव (सिंधी) येथे जाण्याकरिता निघाला, पण रस्त्यातच भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली,यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाली.

रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

आज 20 जून शेवटचा दिवस, त्वरा करा...


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : आज 20 जून हा शेवट चा दिवस आहे. सेल नाही संस्कृती खरेदी करा! नवीन आकर्षक खादी कॉटन डिजाईन खास सवलत. फक्त याच खादी कॉटन महोत्सव मध्येच. आजच भेट द्या आपल्या जवळच्या जैताई मंदिर, वणी येथील सेलला आणि स्वस्तात दर्जेदार खादी चे कपडे खरेदी करा!

वणी रेल्वे स्थानकावर निशुल्क जलसेवा उपक्रमाचा यशस्वी समारोप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : "जलसेवा ही मानव सेवा" असून तहाभागविणे म्हणजे मानवजातीची सेवा करण्यासारखे आहे, हे पुण्याचं कार्य आहे,असं म्हटलं जातं. ह्या उदात्त हेतूने येथील महावीर बहुद्देशीय सेवभावी संस्था, वणी गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे प्रवाशांना पाणी पाजून सामाजिक उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात, संस्थेचे स्वयंसेवक प्रवाशांना उन्हाळ्यात शुद्ध पाण्याची सोय करून देत होते. या सेवेमुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला. या निशुल्क जलसेवेची सांगता उत्सहात शनिवारी करण्यात आली

यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक भंडारी, वणी रेल्वे स्थानक प्रबंधक प्रेमकुमार रंजन हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे विमान अपघातात मृत नागरिकांच्या आत्मांच्या शांतीसाठी दोन मिनिट मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. समारोप व सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद झामड यांनी केले. प्रस्ताविक अध्यक्ष अशोक भंडारी यांनी मांडले तर, आभारप्रदर्शन दीपक छाजेड यांनी केले.

या समारोप व सत्कार प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की,उन्हाळ्यात तहानलेल्या रेल्वे प्रवाश्यांना त्यांच्या डब्ब्याजवळ जाऊन थंड व शुद्ध पिण्याचे पाणी पाजण्याचे महावीर सेवाभावी संस्थेचे हे उपक्रम खरोखर स्तुतनीय आहे. खरं तर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे कर्तव्य रेल्वे विभागाचे आहे. परंतु वणी येथील महावीर सेवाभावी संस्था ही कर्तव्य पार पाडत आहे. असे बहुमोल कार्य महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे केले जातं आहे त्यांचे कार्य असेच सुरु सैदव राहोत. आमदार संजय देरकर यांनी सुद्धा जलसेवा उपक्रम चालविण्याबद्दल महावीर सेवाभावी संस्थेचे कौतुक केले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची स्थायिक व्यवस्थेवर भर देत त्यांनी जलसेवा उपक्रमासाठी आमदार निधीतून आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रेल्वे स्थानकावर जलसेवा उपक्रमात हिरीरीने निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले.तर इतरही उपस्थित मान्यवरांनी या कार्याचे भरभरून कौतुक केले, अशाप्रकारे महावीर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची निःशुल्क जलसेवा स्तुत्य उपक्रमाची सांगता मोठ्या थाटात पार पडली.

या प्रसंगी निःशुल्क जलसेवा उपक्रम समारोप व सत्कार समारंभात रेल्वे प्लेटफार्म वर 'जलसेवा' देणाऱ्या स्वयंसेवकांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.हे विशेष...


चंद्रपूर शहर काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
           
चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी सक्रिय कार्यकर्ते दीपक कटकोजवार यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया च्या पूर्व विदर्भाचे प्रभारी सुमित लोणारे यांनी केली असून नियुक्तीचे पत्रही पाठविले आहे.
           
 या आपल्या नव्या नियुक्तीकरिता सहकार्य केल्याबद्दल दीपक कटकोजवार यांनी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्ह्याच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रेय, माजी प्रदेश सचिव सौ. सुनिताताई लोढीया, शहर जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, माजी महापौर सौ.संगीताताई अमृतकर आदी मान्यवर नेत्यांचे आभार मानले आहे.