टॉप बातम्या

वणी रेल्वे स्थानकावर निशुल्क जलसेवा उपक्रमाचा यशस्वी समारोप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : "जलसेवा ही मानव सेवा" असून तहाभागविणे म्हणजे मानवजातीची सेवा करण्यासारखे आहे, हे पुण्याचं कार्य आहे,असं म्हटलं जातं. ह्या उदात्त हेतूने येथील महावीर बहुद्देशीय सेवभावी संस्था, वणी गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे प्रवाशांना पाणी पाजून सामाजिक उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात, संस्थेचे स्वयंसेवक प्रवाशांना उन्हाळ्यात शुद्ध पाण्याची सोय करून देत होते. या सेवेमुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला. या निशुल्क जलसेवेची सांगता उत्सहात शनिवारी करण्यात आली

यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक भंडारी, वणी रेल्वे स्थानक प्रबंधक प्रेमकुमार रंजन हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे विमान अपघातात मृत नागरिकांच्या आत्मांच्या शांतीसाठी दोन मिनिट मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. समारोप व सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद झामड यांनी केले. प्रस्ताविक अध्यक्ष अशोक भंडारी यांनी मांडले तर, आभारप्रदर्शन दीपक छाजेड यांनी केले.

या समारोप व सत्कार प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की,उन्हाळ्यात तहानलेल्या रेल्वे प्रवाश्यांना त्यांच्या डब्ब्याजवळ जाऊन थंड व शुद्ध पिण्याचे पाणी पाजण्याचे महावीर सेवाभावी संस्थेचे हे उपक्रम खरोखर स्तुतनीय आहे. खरं तर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे कर्तव्य रेल्वे विभागाचे आहे. परंतु वणी येथील महावीर सेवाभावी संस्था ही कर्तव्य पार पाडत आहे. असे बहुमोल कार्य महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे केले जातं आहे त्यांचे कार्य असेच सुरु सैदव राहोत. आमदार संजय देरकर यांनी सुद्धा जलसेवा उपक्रम चालविण्याबद्दल महावीर सेवाभावी संस्थेचे कौतुक केले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची स्थायिक व्यवस्थेवर भर देत त्यांनी जलसेवा उपक्रमासाठी आमदार निधीतून आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रेल्वे स्थानकावर जलसेवा उपक्रमात हिरीरीने निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले.तर इतरही उपस्थित मान्यवरांनी या कार्याचे भरभरून कौतुक केले, अशाप्रकारे महावीर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची निःशुल्क जलसेवा स्तुत्य उपक्रमाची सांगता मोठ्या थाटात पार पडली.

या प्रसंगी निःशुल्क जलसेवा उपक्रम समारोप व सत्कार समारंभात रेल्वे प्लेटफार्म वर 'जलसेवा' देणाऱ्या स्वयंसेवकांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.हे विशेष...


Previous Post Next Post