टॉप बातम्या

चंद्रपूर शहर काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
           
चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी सक्रिय कार्यकर्ते दीपक कटकोजवार यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया च्या पूर्व विदर्भाचे प्रभारी सुमित लोणारे यांनी केली असून नियुक्तीचे पत्रही पाठविले आहे.
           
 या आपल्या नव्या नियुक्तीकरिता सहकार्य केल्याबद्दल दीपक कटकोजवार यांनी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्ह्याच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रेय, माजी प्रदेश सचिव सौ. सुनिताताई लोढीया, शहर जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, माजी महापौर सौ.संगीताताई अमृतकर आदी मान्यवर नेत्यांचे आभार मानले आहे.
Previous Post Next Post