टॉप बातम्या

भारतीय जनता पक्षात शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रवेश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, आणि प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष मा.रवींद्र चव्हाण व वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मजबूत आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून मारेगाव तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे असंख्य मान्यवर, आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आज जाहीर प्रवेश केला आहे.

कुंभा येथील सांस्कृतिक भवनात वणी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा भाजपाचा दुपट्टा घालून पक्षात सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. दुसऱ्यांदा भाजपाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी विराजमान झालेले श्री अविनाश लांबट यांच्या कार्यावर प्रेरित होऊन सर्वांनी प्रवेश केला,या प्रसंगी लांबट यांनी सर्व नवप्रवेशितांना जनसेवेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद भन्साळी, प्रशांत नांदे, राजू मांदाडे, सौ. सुनीता पांढरे, जयवंत ठेपाले, प्रवीण बोथले, माजी सरपंच प्रदिप डाहुले, प्रभाकर घोटेकर, अभिजित मांडेकर सरपंच, दिलीप आत्राम उपसरपंच उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणारे मान्यवर :-
रमेश भेंडाळे, वसंता घोटेकर, अनिल जगताप, किशोर नागपुरे, गजू शेंडे, विनोद चहारे, विनोद भगत, सुनील जगताप, यांच्या प्रमुख नेतृत्वात रमेश भेडाळे, वासुदेव नागपुरे, विनोद चहारे, प्रफुल आत्राम, हनुमान जुमनाके,संजय मोहुर्ले, दिगांवर बोरुले, रमेश मांडवकर, पवन निकुडे, राजु निकुडे, कवडू ठमके, निलेश कामटकर, सुरज कुलकर, स्वप्नील घोटेकर, गजु पुसदेकर,अजय सोनुले, विजय सोनुले, संदीप राऊत, राजू पुसदेकर, महादेव मोहुर्ले, भारत शेंडे, विनोद केळकर,शंकर मोहुर्ले, महादेव किनाके, नागेश आत्राम, प्रभाकर घोटेकर, उत्तम रस्से, निलेश वाढई, नरेंद्र वरपटकर, शंकर चौधरी, मोरेश्वर येरमे, जिवन झाडे, रामा लोणबळे, विठ्ठल टेकाम, मंगेश टेकाम, अंकुश कोयरे, आशु घोटेकर, सचिन नेहारे, सुनील जगताप, शाहू झाडे, बाळू किनाके, अमोल केळकर यासह असंख्य नागरिकांनी पक्षप्रवेश केला आहे.
Previous Post Next Post