सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील शिवणी, कानडा, मुकटा, झगडा (उजाड) येथील गावकरी, शेतकरी आणि वेकोली मधील अधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. ही बैठक आज 19 जून रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद शाळा येथे बोलावण्यात आली होती. भविष्यात वेकोली (WCL) ची प्रस्तावित शिवणी येथे ओपन कास्ट कोळसा खाण होण्याच्या हालचालीला सुरुवात होईल, तत्पूर्वी आधारभूत संबंधित विषयावर शेतकरी व वेकोली अधिकाऱ्यांशी यांच्यात चर्चा करण्यात आली आहे.
या बैठकीला वेकोलीचे जी एम अविनाश प्रसाद, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन पाटील, राजू सुंदेला यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे मत जाणून घेतली.
प्रस्तावित शिवणी (धोबे) या कोळसा खाणीची पर्यावरण जनसुनावणी 2012 मध्ये पार पडली होती. तेव्हापासून प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले होते. आता हा प्रकल्प लवकरच होईल, अशी आशा ग्रामस्थामधे ऐकायला मिळत आहे.
या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून 2012 चे आर.आर. पॉलिसीनूसार जमीन संपादन करण्यात यावी अन्यथा, आमच्या जमीन देणार नाही,असे मत प्रकल्पग्रस्ताच्या वतीने मांडण्यात आले.
या बैठकीत निलेश रासेकर सरपंच शिवणी (धोबे), भारती चिंचोलकर, सरपंच दांडगाव-मुकटा, सुषमा ढोके सरपंच कानडा, प्रकाश डाहूले, अशोक धोबे, रूपेश ढोके, पांडूरंग लोहे, अजय धोबे, शरद ताजणे, निलेश ढेंगळे, प्रमोद धोबे, प्रकल्प ग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.