Top News

ज्योती किराणा शॉप अँड जनरल वर छापा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहराच्या हद्दीत पोलिसांनी सुगंधित तंबाखूवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई केली असून सिंदी कॉलनी येथील एका विक्रेत्याकडून हजारो रुपयाचा अवैध तंबाखू जप्त केला आहे. ही कारवाई 18 जून रोजी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांनी केली.

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. तरी देखील प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी मे ज्योती किराणा शॉप अँड जनरल,रेस्ट हाऊस वणी च्या समोरील असलेल्या ठिकाणी साठवणूक केला होता, लोकसेवकांच्या दि.12 /08/2024 रोजी च्या प्रतिबंधित आदेशाचे उलंघन करून मनिष नंदकिशोर फेरवाणी (31) रा सिंदी कॉलनी, वणी याने भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा केलेला आहे. तसेच सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ हे मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून व त्याचे सेवनाने कर्करोगासारखे दुर्धर आजार होऊ शकते, म्हणून यावर शासनाने निर्बंध घातले आहे. हे पूर्णपणे ज्ञात असूनही सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाची जाणीवपूर्वक विक्रीसाठी वाहतूक करून त्यांनी भारतीय न्याय संहिता कलम 274,275 व कलम 123 नुसार गुन्हा केला आहे. 

या धाडीत मजा, ईगल तंबाखू, अन्नी गोल्ड स्वीट सुपारी, फ्लेवर्ड पान मसाला इत्यादी सह 30,613 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचेवर कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील 2011 चे कलम 26 (1), 26(2) (iv),27(3)(e),30(2) (a), कलम 3(1)(zz) (v), भारतीय न्याय संहिता कलम 223, 274,275 व कलम 123 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पुढील तपास वणी पोलीस करत आहे.



Previous Post Next Post