टॉप बातम्या

दुचाकीला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : करंजी-मारेगाव या राज्य महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.20) रोज शुक्रवारला 4 वाजताच्या सुमारास घडली.

अमित भास्कर दर्वे (वय अंदाजे 24 वर्षे) रा.महागाव (सिंधी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहेत. अमित हा आज सकाळी महागाव येथून काही कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आला होता. तेथील काम आटोपून तो दुपारी चार वाजता सुमारास स्वगावी महागाव (सिंधी) येथे जाण्याकरिता निघाला, पण रस्त्यातच भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली,यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाली.

रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Previous Post Next Post