भारतीय जनता पक्षात शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रवेश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, आणि प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष मा.रवींद्र चव्हाण व वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मजबूत आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून मारेगाव तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे असंख्य मान्यवर, आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आज जाहीर प्रवेश केला आहे.

कुंभा येथील सांस्कृतिक भवनात वणी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा भाजपाचा दुपट्टा घालून पक्षात सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. दुसऱ्यांदा भाजपाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी विराजमान झालेले श्री अविनाश लांबट यांच्या कार्यावर प्रेरित होऊन सर्वांनी प्रवेश केला,या प्रसंगी लांबट यांनी सर्व नवप्रवेशितांना जनसेवेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद भन्साळी, प्रशांत नांदे, राजू मांदाडे, सौ. सुनीता पांढरे, जयवंत ठेपाले, प्रवीण बोथले, माजी सरपंच प्रदिप डाहुले, प्रभाकर घोटेकर, अभिजित मांडेकर सरपंच, दिलीप आत्राम उपसरपंच उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणारे मान्यवर :-
रमेश भेंडाळे, वसंता घोटेकर, अनिल जगताप, किशोर नागपुरे, गजू शेंडे, विनोद चहारे, विनोद भगत, सुनील जगताप, यांच्या प्रमुख नेतृत्वात रमेश भेडाळे, वासुदेव नागपुरे, विनोद चहारे, प्रफुल आत्राम, हनुमान जुमनाके,संजय मोहुर्ले, दिगांवर बोरुले, रमेश मांडवकर, पवन निकुडे, राजु निकुडे, कवडू ठमके, निलेश कामटकर, सुरज कुलकर, स्वप्नील घोटेकर, गजु पुसदेकर,अजय सोनुले, विजय सोनुले, संदीप राऊत, राजू पुसदेकर, महादेव मोहुर्ले, भारत शेंडे, विनोद केळकर,शंकर मोहुर्ले, महादेव किनाके, नागेश आत्राम, प्रभाकर घोटेकर, उत्तम रस्से, निलेश वाढई, नरेंद्र वरपटकर, शंकर चौधरी, मोरेश्वर येरमे, जिवन झाडे, रामा लोणबळे, विठ्ठल टेकाम, मंगेश टेकाम, अंकुश कोयरे, आशु घोटेकर, सचिन नेहारे, सुनील जगताप, शाहू झाडे, बाळू किनाके, अमोल केळकर यासह असंख्य नागरिकांनी पक्षप्रवेश केला आहे.

शिवणी (धोबे) येथे वेकोली अधिकाऱ्यांनी केली गावकऱ्यासोबत चर्चा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील शिवणी, कानडा, मुकटा, झगडा (उजाड) येथील गावकरी, शेतकरी आणि वेकोली मधील अधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. ही बैठक आज 19 जून रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद शाळा येथे बोलावण्यात आली होती. भविष्यात वेकोली (WCL) ची प्रस्तावित शिवणी येथे ओपन कास्ट कोळसा खाण होण्याच्या हालचालीला सुरुवात होईल, तत्पूर्वी आधारभूत संबंधित विषयावर शेतकरी व वेकोली अधिकाऱ्यांशी यांच्यात चर्चा करण्यात आली आहे.

या बैठकीला वेकोलीचे जी एम अविनाश प्रसाद, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन पाटील, राजू सुंदेला यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे मत जाणून घेतली. 

प्रस्तावित शिवणी (धोबे) या कोळसा खाणीची पर्यावरण जनसुनावणी 2012 मध्ये पार पडली होती. तेव्हापासून प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले होते. आता हा प्रकल्प लवकरच होईल, अशी आशा ग्रामस्थामधे ऐकायला मिळत आहे. 

या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून 2012 चे आर.आर. पॉलिसीनूसार जमीन संपादन करण्यात यावी अन्यथा, आमच्या जमीन देणार नाही,असे मत प्रकल्पग्रस्ताच्या वतीने मांडण्यात आले. 

या बैठकीत निलेश रासेकर सरपंच शिवणी (धोबे), भारती चिंचोलकर, सरपंच दांडगाव-मुकटा, सुषमा ढोके सरपंच कानडा, प्रकाश डाहूले, अशोक धोबे, रूपेश ढोके, पांडूरंग लोहे, अजय धोबे, शरद ताजणे, निलेश ढेंगळे, प्रमोद धोबे, प्रकल्प ग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.






ज्योती किराणा शॉप अँड जनरल वर छापा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहराच्या हद्दीत पोलिसांनी सुगंधित तंबाखूवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई केली असून सिंदी कॉलनी येथील एका विक्रेत्याकडून हजारो रुपयाचा अवैध तंबाखू जप्त केला आहे. ही कारवाई 18 जून रोजी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांनी केली.

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. तरी देखील प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी मे ज्योती किराणा शॉप अँड जनरल,रेस्ट हाऊस वणी च्या समोरील असलेल्या ठिकाणी साठवणूक केला होता, लोकसेवकांच्या दि.12 /08/2024 रोजी च्या प्रतिबंधित आदेशाचे उलंघन करून मनिष नंदकिशोर फेरवाणी (31) रा सिंदी कॉलनी, वणी याने भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा केलेला आहे. तसेच सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ हे मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून व त्याचे सेवनाने कर्करोगासारखे दुर्धर आजार होऊ शकते, म्हणून यावर शासनाने निर्बंध घातले आहे. हे पूर्णपणे ज्ञात असूनही सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाची जाणीवपूर्वक विक्रीसाठी वाहतूक करून त्यांनी भारतीय न्याय संहिता कलम 274,275 व कलम 123 नुसार गुन्हा केला आहे. 

या धाडीत मजा, ईगल तंबाखू, अन्नी गोल्ड स्वीट सुपारी, फ्लेवर्ड पान मसाला इत्यादी सह 30,613 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचेवर कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील 2011 चे कलम 26 (1), 26(2) (iv),27(3)(e),30(2) (a), कलम 3(1)(zz) (v), भारतीय न्याय संहिता कलम 223, 274,275 व कलम 123 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पुढील तपास वणी पोलीस करत आहे.



जिल्हाधिकाऱ्याचे वेकोलि अधिका-यांना सूचना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : उकणी येथील उर्वरीत 10 टक्के जमिनीचे त्वरीत संपादन करून संपूर्ण पूनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी विकास मिना यांनी वेकोलि अधिका-यांना केली. बुधवारी दिनांक 18 जून रोजी भालर येथील वेकोलि रेस्ट हाऊस येथे जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत कोलारपिंपरी कोळसा खाण प्रकल्प, वेकोली-वणी क्षेत्र, वणी नॉर्थ प्रकल्प आदींसह विविध खाणींसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला खा. प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती. 

उकणी या क्षेत्रातील 85 ते 90 टक्के जमीन वेकोलीने संपादित केली. परंतु उर्वरीत 600 एकर जमिनीचे अद्यापही संपादन झालेले नाही. या भूमीवर सुमारे 175 शेतकरी उदरनिर्वाह करतात. ही जमीन वेकोलीने संपादित न केल्याने या शेतकऱ्यांना ही जमीन सोडावी लागेल. जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत वेकोलि सुरक्षा समितीचे सदस्य संजय खाडे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. 

त्यावर जिल्हाधिकारी यांनी उकणी गावातील उर्वरित जमिनीचे त्वरित संपादन करून संपूर्ण पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना वेकोलि अधिका-यांना दिल्या. बैठकीत खा. प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलिसंबंधीत विविध प्रश्न आक्रमकपणे मांडले. वणी नॉर्थ कोलारपिंपरी ओपन कास्ट प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनींचा अद्याप मोबदला मिळालेला नाही. यावर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून लवकरात लवकर मोबदला वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 

या बैठकीला उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, तहसीलदार निखिल धुळधर, वेकोली वणीचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुजित पिसारोडी, वणी नॉर्थचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. संजीवा रेड्डी यांच्यांसह उकणी, कोलारपिंपरी, ब्राम्हणी, अहेरी येथील नागरिक उपस्थित होते.

लग्नाचं आमिष दाखवून 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नांदेपेरा येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने सदरील तरुणीला आत्महत्याची धमकी दिली व त्याच्या सोबत नग्न अवस्थेत असलेले छायाचित्र बदनामी होईल या उद्देश वायरल केले असून आता याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी तालुक्यातील या 19 वर्षीय तरुणीला रोशन विठ्ठल गोबाडे (24) रा. नांदेपेरा याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. तो इथेच थांबला नाही तर त्याने आत्महत्या करतोय अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला व तीचे नग्न अवस्थेत असलेले फोटो व्हिडीओ वायरल केले ही बाब उघड झाल्यानंतर रोशन गोबाडे विरोधात कलम 354, (c).376 (2) (n) भादवि सह क. 3 (1).4.5 (1), 6,11 (5), 12 फोक्सो सहकलम 66(E),67 (B), IT ACT प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिकचा तपास वणी पोलीस करत आहेत.