अपघातात तीस वर्षीय युवकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : अपरिचित आडवं जनावरं आले आणि तीस वर्षाच्या युवकाचा अपघात होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना रविवारी 16 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी ते नांदेपेरा मार्गांवर घडली. या घटनेने वांजरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राहूल सुरेश धांडे रा. वांजरी असे मृतकाचे नाव आहे. तो दुचाकी क्र. (एम एच 29-सी डी, 5247) ने वणीवरून वांजरी या आपल्या गावी परतत असताना वणी ते नांदेपेरा मार्गांवर,ठेंगळे यांचे घरा नजीक अनोळखी जनावर आडवं आल्यामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले व हा जनावर आणि मोटारसायकलच्या धडकेत सायंकाळी साडे सात वा.अपघात घडला. यात राहुलला जीव गमवण्याचीही वेळ आली. त्याच्या डोक्यात मुका मार लागल्याने तो ठार झाला. याबाबत वणी पोलिसात माहिती देण्यात आली. 

सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. 

स्व. मारोती रोगे व स्व सुनंदाबाई रोगे स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव येथे पाणपोई सुरु

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मार्च महिना लागताच नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. विविध कार्यक्रम,लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने मारेगावात वाटसरुंची गर्दीही वाढली आहे. अशातच नागरिकांची तहान भागवण्यासाठी मारेगाव पोलीस वेलफेअर पेट्रोल पम्प येथे स्व. मारोती रोगे व स्व. सुनंदाबाई रोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ठाणेदार संजय सोळंके यांच्या विशेष मार्गदर्शनात उपनिरीक्षक जाधव यांनी या पाणपोईचे उदघाटन केले. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता दयाल रोगे यांच्या पुढाकाराने व आईवडील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.यावेळी पोलीस दल, होमगार्ड, व पेट्रोल पम्प कर्मचारी उपस्थित होते.
    

मानवी हकाचे जतन करा - राजु धांवंजेवार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

उमरखेड : सामान्य जनतेवर होणारा अन्याय कधीही खपवुन घेतला आणार नाही परंतु प्रत्येक मानसाने आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण ठेवुन मानवी हकाचे जतन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी उमरखेड येथे मानवी हक सुरक्षा परिषेदेच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. आज दि.१६ मार्च रोजी मानवी हक्क सुरक्षा परिषदेची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमरखेड तालुकाध्यक्ष श्री राजु बोंडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष श्री प्रशांत हरडपकर यांनी मानले.
घटनेतील विवीध कलमान्वये प्रत्येक व्यक्तीला समतेचा, स्वातंत्र्याचा व्यवसाय करण्याचा धार्मीक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
या बैठकीला मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेश कार्यकारी सदस्य परशुराम पोटे, मारेगाव तालुका अध्यक्ष अमोल कुमरे, विदर्भ कार्यकारिणी सदस्य वेणूदास हुसूकले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम काकडे, नवनियुक्त उमरखेड तालुका अध्यक्ष राजु बोंडगे, उपाध्यक्ष संजय भंडारे, सचिव आकाश लोमट, उमरखेड शहर अध्यक्ष प्रशांत हरडपकर, उपाध्यक्ष आत्माराम सुरोशे, सचिव शिशिर गीरी, सहसचिव किशोर बोरगडे, संपर्क प्रमुख नानाराव खापरे, राहुल कोळपे, रत्नदीप पाईकराव, विष्णू गोरे, अवधूत खडकर, बाबा उर्फ आनंद शिंदे, प्रविण सुर्यवंशी यांच्यासह मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वणीत पार पडणार भव्य शिवजयंती सोहळा, मनसेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई व फटाक्याची शाही अतिशाबाजी प्रमुख आकर्षण राहणार आहे. ताशांचा गजर, नृत्य, झांजांचा निनाद, आकर्षक देखावा आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

यामध्ये गत वर्षी तुळजा भवानी मातेचा भव्य दिव्य देखावा, शिवरायांचा महाअभिषेक, ढोल ताशा पथकाचे वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हीच परंपरा कायम ठेवत याही वर्षी शिवजयंती सोहळ्यानिमित्त वणी परिसर भगवामय करून, चौकाचौकात भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करण्यात येईल.

वणीत पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ सकाळी ०७.०० वाजता पुतळ्यास महाअभिषेक करून करण्यात येईल. त्यानंतर याठिकाणी अनेक शिवभक्तां कडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी मात्र ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात हा सोहळा संपन्न होईल. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून देण्यात आली. या कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन पक्षनेते राजू उंबरकर यांनी केले आहे.

सुनेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याच्या मंडळींविरोधात गुन्हा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : लग्न झाल्यापासून पती, सासू सासरे व नणंद यांनी संगणमत करून २८ वर्षीय सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी सासऱ्याच्या मंडळींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विवाहसंबधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिरित्या कट रचण्याचा प्रयत्न...हा प्रकार मारेगाव तालुक्यात घडला आहे. संजना सतीश सिडाम (सध्या रा. गोंडबुरांडा, मारेगाव) असे पीडित तरुणीचे नाव आहे. वार्ड नं १ रेस्ट हाऊस जवळ मारेगाव (ता. मारेगाव) येथील सतीश श्रीधर सिडाम याच्याबरोबर १७ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न केले. लग्नानंतर वारंवार पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू ताराबाई श्रीधर सिडाम, पूजा श्रीधर सिडाम, मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे. असं फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

त्यामुळे या जाचाला कंटाळून अखेर सुनेने पोलिसात धाव घेऊन वरील सहाजनाविरोधात कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.