सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील वामनघाट रोड घरसंसार परिसराच्या बाजूच्या मागील गल्लीत वास्तव्यास असलेल्या एका युवकांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची आज (१ डिसें.) ला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील दोघांना ताब्यात घेतलं असून प्रकृती गंभीर असलेल्या युवकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
प्रणय मुकुंद मुने (अंदाजे वय २३ रा. माळीपुरा) असे हल्ल्यात गंभीर जखमीचे नाव आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने घरात घुसून त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार करून सशस्त्र हल्ला केला. प्रणयला उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे रवाना केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून जखमीला नागपूर ला पाठवले आहे. हल्लेखोर हे हिंगणघाट वर्धा जिल्हा येथील असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर युवकांवर हल्ला का केला? हे पोलिस तपासातून समोर येणार असून तूर्तास वणी शहरात या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वणीमध्ये युवकांवर दोघांकडून सशस्त्र हल्ला; तरुण गंभीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 01, 2024
Rating:
