त्यांच्या धाडसाने 'ते' आरोपी झाले जेरबंद


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : 1 डिसेंबर रोज रविवारी सकाळी नऊ च्या सुमारास घरात घुसून एका युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यात युवक गंभीर जखमी झाला त्याचेवर नागपूर येथे उपचार सुरु आहे. मात्र, या घटनेतील आरोपीना घरात डांबून ठेवण्यात आल्याने ताई आणि काकांच्या दाखवलेल्या धाडसचं सर्वत्र कुतूहलाने कौतुक होतं आहे.
प्रणय मुकुंद मुने (23) असे त्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील मध्यवर्ती भागात आपल्या आई सह वास्तव्यास असलेल्या वरील नमूद युवकांवर घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्याला त्याच्याच घरात खाली पाडून गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले, ही धक्कादायक घटना आई च्या तत्काळ निदर्शनास येताच तिने आरडा ओरड केली. त्यामुळे आवाजाच्या दिशेने शेजारील लोक धावली आणि बघतात तर काय प्रणय हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. शेजारील ताईंनी व काकांनी क्षणाचा विलंब न कर्ता आणि मोठ्या हिमतीने घराचे दार बाहेरून बंद केले, त्यामुळे आरोपी सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकले. "जर बाहेरून दार बंद केले नसते तर आरोपी हाती लागले नसते आणि कदाचित पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्यास मोठं आव्हाने असते", असं खुद पोलीस प्रशासनातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या ताईचं आणि काकांचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी दाखवलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. 

आरोपी अजिक्य संतोष चौधरी (24) रा. हिंगणघाट, विधी संघर्ष बालक रा. हिंगणघाट जि. वर्धा असे त्याचे नाव आहे. यातील अजिंक्य चौधरी यावर 302 गुन्हा हिंगणघाट मध्ये दाखल आहे. याप्रकरणी आरोपीवर बीएन एस 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अपसुंदे, एपीआय रत्नपारखी, पीएसआय गुल्हाने, पीएसआय आश्वले, ह्यांची चमु सखोल चौकशी करीत आहे.

• वर्दळीच्या ठिकाणी जीवघेणा हल्ला
घटना शहरातील घरसंसार सेलजवळ घडली, जे ठिकाण अत्यंत वर्दळीचे आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या हल्ल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

• वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता
वणीसारख्या शांत शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले असून, सुरक्षा व्यवस्थेची चांगली व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे. 

• शहरात सुरक्षा वाढवण्याची गरज
या घटनेने शहरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
त्यांच्या धाडसाने 'ते' आरोपी झाले जेरबंद त्यांच्या धाडसाने 'ते' आरोपी झाले जेरबंद Reviewed by सह्याद्री चौफेर on December 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.