सोमवार पासून ६ जिनिंगवर होणार सीसीआयची कापूस खरेदी,जिनिंग मध्येच होणार ऑनलाईन नोंदणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील सी सी आय कापूस खरेदी उद्या सोमवार पासून तब्बल ६ जीनिंगवर सुरू होणार आहे. व त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन अत्यावध प्रणालीची पूर्तता करण्यात येणार आहे. यासाठी सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युद्ध पातळीवर काम चालू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सीसीआयचे केंद्र प्रमुख हेमंत कुमार ठाकरे यांनी दिली आहे. 

बुधवारी २७ डिसेंबर रोजी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्या अधिकाऱ्याना सोबत घेवून बैठक घेतली. यात कापूस खरेदीबाबत अत्यावध प्रणालीसाठी लागणारे टोकण बंद करून सरळ कापूस खरेदी करून तिथेच त्यांची अत्यावध नोंदणी करण्यासाठी ठरले होते. 

वणी येथे केवळ ३ जीनिंग मध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. तर केवळ २ संगणकावर कृ.ऊ. बा.स. मध्ये अद्ययावत (ऑनलाईन) नोंदणी सुरू होती. त्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता टोकण देण्यात येत होते. टोकण घेवूनही शेतकऱ्यांची अद्ययावत (ऑनलाईन) नोंदणी प्रलंबित पडत होती. शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी आ. संजय देरकर यांनी टोकण पद्धत बंद करण्याचे सुचवले व सीसीआय सोबत करारनामा झालेल्या सर्व जिंनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यासाठी आदेशित केले होते. यावरून बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी अतिरिक्त दोन सेंटर सुरू करण्यात आली असून असे चार सेंटरवर नोंदणी सुरू करण्यात येईल असे झाडे यांनी सांगितले होतं.

सीसीआय कडून वणी येथील एस.बी., महाविरा, साईकृपा, राजा, गुलाब, नगरवाला अश्या ६ जिनिंग धारकांकडून कापूस खरेदीसाठी करारनामा करण्यात आला आहे. परंतु केवळ आळीपाळीने ३ जीनिंगमध्ये खरेदी सुरू होती. ती उद्या सोमवार पासून ६ ह्या केंद्रावर खरेदी सुरू करणार आहे. दररोज ४०० ते ५०० वाहने कापूस खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर सीसीआय व कृ.ऊ.बा.स. कडून व्यवस्था केली जाणार आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी लागणारे टोकण पद्धत आज पासून बंद करण्यात आली आहे. परंतु ऑनलाईन पद्धत करणे अनिवार्य आहे. 

ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकण देण्यात येत होते. आणि दररोज केवळ ५० वाहने कापूस खरेदी केल्या जात होते. ते टोकण बंद करून सरळ खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर ऑनलाईन करून कापूस भरलेली वाहने काटा करून पावती देण्यात येणार आहे. कापसाचा चुकारा जमा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आधारकार्ड, लिंक असलेले बँक खाते पुस्तक, ७/१२ व २०२४ -२५ चे पेरावे पत्रक असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ज्यांच्या नावाने ७/१२ आहे ते किंव्हा त्यांच्या रक्त मासातील व्यक्ती उपस्थित असणे अनिवार्य आहे. 


सोमवार पासून ६ जिनिंगवर होणार सीसीआयची कापूस खरेदी,जिनिंग मध्येच होणार ऑनलाईन नोंदणी सोमवार पासून ६ जिनिंगवर होणार सीसीआयची कापूस खरेदी,जिनिंग मध्येच होणार ऑनलाईन नोंदणी Reviewed by सह्याद्री चौफेर on December 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.