सुनेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याच्या मंडळींविरोधात गुन्हा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : लग्न झाल्यापासून पती, सासू सासरे व नणंद यांनी संगणमत करून २८ वर्षीय सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी सासऱ्याच्या मंडळींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विवाहसंबधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिरित्या कट रचण्याचा प्रयत्न...हा प्रकार मारेगाव तालुक्यात घडला आहे. संजना सतीश सिडाम (सध्या रा. गोंडबुरांडा, मारेगाव) असे पीडित तरुणीचे नाव आहे. वार्ड नं १ रेस्ट हाऊस जवळ मारेगाव (ता. मारेगाव) येथील सतीश श्रीधर सिडाम याच्याबरोबर १७ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न केले. लग्नानंतर वारंवार पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू ताराबाई श्रीधर सिडाम, पूजा श्रीधर सिडाम, मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे. असं फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

त्यामुळे या जाचाला कंटाळून अखेर सुनेने पोलिसात धाव घेऊन वरील सहाजनाविरोधात कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सुनेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याच्या मंडळींविरोधात गुन्हा सुनेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याच्या मंडळींविरोधात गुन्हा Reviewed by सह्याद्री चौफेर on March 16, 2025 Rating: 5
Powered by Blogger.