सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तहसील कार्यालयाजवळ एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अंकुश मोगरे याचा गाडी लावण्याच्या कारणावरून आरोपींशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपींनी काठ्या व लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर, पाठीवर व हातापायावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत तो पोलीस स्टेशनकडे जात असताना आरोपींनी पुन्हा त्याचा पाठलाग करून तहसील कार्यालयाजवळील जी.आर. नाश्ता सेंटरसमोर त्याला खाली पाडून मारहाण केली. यावेळी आरोपी विशाल चौहाण याने वारंवार काठीने डोक्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी फिर्यादी भोलेश्वर नारायण ताराचंद यांच्या तक्रारीवरून विलास चौहाण, विशाल चौहाण, सूर्यभान चौहाण, विरसिंग उर्फ विरु लीवारे, दुर्गेश उर्फ सोनु चौहाण, एक विधी संघर्ष बालक आणि दोन अनोळखी व्यक्तींवर कलम 109, 189(1)(2)(3)(4), 190, 191(1)(2)(3) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. सुदाम आसोरे करीत आहेत.