टॉप बातम्या

करवाढ व हद्दवाढ मागे घेण्यासाठी शिवसेनेचे नगर परिषदेला निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आज वणी नगर परिषदेला शिवसेना पक्षाकडून माजी आमदार तसेच यवतमाळ-चंद्रपूर लोकसभा समन्वयक श्री विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात करवाढ व हद्दवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

सामान्य जनतेला परवडणार नाही अशी करवाढ नगर परिषदेने तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम भूमिका यावेळी नांदेकर यांनी मांडली. या संदर्भात ते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवेदन देताना 2025-26 चे कर भरल्याशिवाय आक्षेप नोंदवता येणार नाही ही अट रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यांनी ती मान्य केल्याचेही स्पष्ट झाले. तसेच वणी शहरातील पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.

या निवेदनावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. उज्वला चंदनखेडे, विधानसभा संघटिका सौ. संगीता मुरसकर, तालुकाप्रमुख सौ. मनिषा कोंगरे, शहर प्रमुख सौ. वसुधा ढगे, तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे, शहर प्रमुख शिवराज पेचे, उपतालुकाप्रमुख धीरज राजूरकर व अनिल उलमाले, तालुका संघटक नरेंद्र बदखल, उपशहर प्रमुख संतोष लक्षशेट्टीवार व प्रवीण पिसे, शहर संघटक अजय नागपुरे, शहर समन्वयक महेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();