सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण अधिनियम 2006 आणि 2018 मधील तरतुदीनुसार वणी शहरात प्लास्टिक वापरावर बंदी घालून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जनवादी पक्षाच्यावतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले.
निवेदनात प्लास्टिकमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तातडीने रोखण्यासाठी शहरात प्लास्टिकमुक्त मोहिम राबवावी, तसेच प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन मोबिन शेख – उपजिल्हाप्रमुख, अनिकेत चामाटे – तालुकाप्रमुख, मुन्ना विठ्ठल बेरेकार – तालुका सचिव, जनार्दन टेकाम – उपतालुकाप्रमुख, पहार शेतकरी संघटना तालुकाप्रमुख, सचिन राखुंडे – शहरप्रमुख, वाहतूक आघाडी, विजय अलमे – तालुकाप्रमुख, वाहतूक आघाडी, तुळशीराम ठाकरे – तालुकाप्रमुख, प्रहार सहकार संघटना, रशीद इस्माईल शेख – तालुकाप्रमुख, प्रहार अल्पसंख्याक संघटना यांच्या उपस्थित देण्यात आले.