सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई व फटाक्याची शाही अतिशाबाजी प्रमुख आकर्षण राहणार आहे. ताशांचा गजर, नृत्य, झांजांचा निनाद, आकर्षक देखावा आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये गत वर्षी तुळजा भवानी मातेचा भव्य दिव्य देखावा, शिवरायांचा महाअभिषेक, ढोल ताशा पथकाचे वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हीच परंपरा कायम ठेवत याही वर्षी शिवजयंती सोहळ्यानिमित्त वणी परिसर भगवामय करून, चौकाचौकात भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करण्यात येईल.
वणीत पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ सकाळी ०७.०० वाजता पुतळ्यास महाअभिषेक करून करण्यात येईल. त्यानंतर याठिकाणी अनेक शिवभक्तां कडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी मात्र ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात हा सोहळा संपन्न होईल. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून देण्यात आली. या कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन पक्षनेते राजू उंबरकर यांनी केले आहे.
वणीत पार पडणार भव्य शिवजयंती सोहळा, मनसेचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 16, 2025
Rating: