टॉप बातम्या

गणेश गाणफाडे यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने गणेश मनोहर गाणफाडे (रा.देवाळा) यांनी आज मारेगाव येथे अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, किसान मोर्चाचे अध्यक्ष पवन ढवस, तालुका सचिव अमोल कुमरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील देऊळकर, प्रवीण बोथले, आदिवासी सेल चे अध्यक्ष दादाराव ढोबरे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या लोककल्याणकारी विचारधारेवर विश्वास ठेवून गणेश गाणफाडे यांनी पक्षात प्रवेश केल्याने पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, तसेच आगामी काळात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();