टॉप बातम्या

पोलीस असल्याची खोटी ओळख देत शेतकऱ्याकडून खंडणी वसुल; मारेगाव पोलिसांनी तिघा तोतया पोलिसांना अटक

सह्याद्री चौफेर|ऑनलाईन

मारेगाव : पोलीस असल्याची बनावट ओळख सांगून एका शेतकऱ्याला मारहाण करून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार मारेगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या घटनेची तक्रार मिळताच मारेगाव पोलिसांनी तत्काळ हालचाली करत अवघ्या तासाभरात पाठलाग करून तीन तोतया पोलिसांना अटक केली.

१४ जानेवारी रोजी सायंकाळी नांदेपेरा मार्डी मार्गांवर असलेल्या वनोजादेवी फाट्यावरील एका हॉटेलसमोर ही घटना घडली. मंगेश दिलीप मेश्राम (वय ३०) हे मित्रासोबत चहा घेत असताना, चारचाकी वाहनातून उतरलेल्या तिघांनी वाद घालत स्वतःला एलसीबी पोलीस असल्याचे सांगितले. किरकोळ कारणावरून त्यांनी मंगेश यांना शिवीगाळ व मारहाण केली. घाबरून मंगेश घराकडे पळाले असता, आरोपींनी कारने पाठलाग करून त्यांच्या घरी जाऊन वडिलांना धमकावत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून १,५०० रुपयांची खंडणी उकळली.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मंगेश यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी वनोजादेवी मार्गावर नाकाबंदी करत मार्डी चौकात चारचाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षल ठाकरे, हरीष ठाकरे (रा. वर्धा) आणि अनंता धोटे (रा. कळंब, यवतमाळ) यांचा समावेश आहे. 

या तिघांविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलीस असल्याची ओळख सांगणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्राची खात्री करूनच सहकार्य करावे, तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार वानखेडे मारेगाव पोलिस यांनी नागरिकांना केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();