सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कै. महादेवराव पावडे पाटील ग्रामीण बहुउद्देशीय संस्था दरा (साखरा), ता. झरी (जामनी), जि. यवतमाळ यांच्या वतीने संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बाळापूर (बोपापुर) येथे पालक मेळावा तथा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५-२६ चे आयोजन दि. ८ ते १२ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले.
महोत्सवाअंतर्गत क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, काव्यवाचन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पालक मेळावा, सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. तसेच दि. १० जानेवारी रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शाळेचे अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. रुद्राकर बेलेकार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली नांदेकर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर दत्ता मत्ते, अभियंता सुमित पावडे, केतन मोहारे, सूरज धनवलकर, समीर ढेंगळे, लक्ष्मण खोंडे, प्रकाश चिकराम, प्रवीण बोंडे, रोशन चिकराम, निकेश पत्रकार, विपूल मोहितकर, कु. नयन उपरे, कु. दिव्या पानघाटे आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर बरशेट्टीवार यांनी केले.
या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक प्रदीप बोरकुटे, नितीन वानखडे, प्रकाश नांदेकर, प्रयोगशाळा परिचर मनोज आंबाडे, शिक्षकेत्तर कर्मचारी चंद्रशेखर बोकडे, स्मित आमटे, अनिल पेंदोर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.