सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज (शिवतीर्थ), वणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून भगवा ध्वज फडकावत भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
या मॅराथॉन स्पर्धेत युवक, महिला, बालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्पर्धा एकूण चार गटांमध्ये घेण्यात आली. त्यातील विजेते पुढीलप्रमाणे —
🔹ओपन गट – मुले
प्रथम : विरोचन गोडे
द्वितीय : सौरभ दरणे
तृतीय : शिवम जंगठे
चतुर्थ : पियूष पडलमवार
🔹ओपन गट – मुली
प्रथम : गौरी पांगुळ
द्वितीय : प्रशांती वसाके
तृतीय : अचल झिले
चतुर्थ : समीक्षा हनमंते
🔹 १६ वर्षांखालील गट – मुले
प्रथम : शिवम ओझा
द्वितीय : शिवम कुइटे
तृतीय : सुमित ढेंगळे
चतुर्थ : अयान सिद्दिकी
🔹 १६ वर्षांखालील गट – मुली
प्रथम : नव्या पिदुरकर
द्वितीय : पल्लवी ठाकरे
तृतीय : जानवी ठाकरे
चतुर्थ : श्रद्धा देशमुख
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट नियोजन, सुरक्षिततेची योग्य व्यवस्था व उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले.
हा उपक्रम आमदार संजयभाऊ देरकर व किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा शाल व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या मॅराथॉन स्पर्धेमुळे युवकांमध्ये आरोग्य, क्रीडासंस्कृती आणि सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ. संचिताताई नगराळे, सुरेखाताई ढेंगळे, दीपक कोकास, सुनील कातकडे, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे, रवी बोढेकर, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, राजू तुराणकर, अजय चन्ने, डॉ. विलास बोबडे, टिकाराम खाडे, बबन केळकर, राजू पाटील, चेतन उलमले, मिलिंद बावणे, संजोग झाडे, कुणाल खामकर, अक्षय लाडे व संस्कार हेपट यांची प्रमुख उपस्थिती होती.
