सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोसारा येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुपारी १ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोसारा येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया अंकुशराव खाडे, उपसरपंच सचिन पचारे, माजी सरपंच पांडुरंग नन्नावरे, सुभाष खडसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शोभा कुत्तरमारे, रेखा चिचुलकर, अंकुश खाडे तसेच सोसायटी अध्यक्ष कवडू येडमे, उपाध्यक्ष राजू पचारे, संचालक खेमराज गाणार, गजानन धानोरकर, सुरेश खडसे, धनराज खडसे (जिल्हा बँक प्रतिनिधी) आदी मान्यवर तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सायंकाळी ७ वाजता कोसारा येथील भागवत मंडपातही समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडला.

