सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी तालुक्यातील सेलू व भुरकी या गावाचा संपर्क तुल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत असून शालेय विद्यार्थ्यांची शाळा, आरोग्य, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच शेतातील उभे पिके पाण्याखाली आली आहे.
शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी च्या रात्री पासूनच सेलू गावाच्या पुलावरून पाणी वाहत आहे. तर भुरकी गावाचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली.