सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : काँग्रेस नेते संजय खाडे यांची वणी विधानसभा क्षेत्रातील कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना आणखी एक मोठी जबाबदारी त्यांच्या वर सोपवली आहे. नुकतीच त्यांची अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच पक्षाने त्यांना प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
राजकीय तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संजय खाडे हे वणी उपविभागात कामगार आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन आणि विविध मोर्चे काढून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला आहे.
अचलपूर मतदारसंघात ते ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, युवक आणि महिला मतदारांशी संपर्क वाढवून पक्षाची ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. पक्षाने दाखवलेला विश्वास अभिमानास्पद असुन हा विश्वास सार्थ करण्यासाठी मतदारसंघात पूर्ण ताकदीने काम करणार, असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.