टॉप बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची तत्काळ दुरुस्ती करा, अन्यथा भिकमांगो आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय दुरुस्तीचे काम दीर्घकाळापासून रखडले असून हे काम तत्काळ पूर्ण व्हावे, अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून नगर परिषदेला दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाचनालय हे समाजजागृती आणि विद्यार्थ्यांसाठी म्हत्वाचे केंद्र आहे. मात्र, वाचनालय बंद असल्याने वाचनालयाच्या दुरुस्ती व पुर्नउभारणीसाठी भीमआर्मीने अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. यानंतरही आतापर्यंत वाचनालयाचे काम पूर्ण झालेले नाही.

दि. 17 जुलै 2025 रोजी भीमआर्मीच्या वतीने मुख्याधिकारी सचिन गाडे यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली, तेव्हा निधीअभावी काम थांबले असल्याचे कारण त्यांनी सांगितले असे निवेदकांचे म्हणणं आहे.

दि. 9 सप्टेंबर 2025 रोजी नगरपरिषदेला भीमआर्मीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा निवेदन दिले. या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला की, येत्या आठ दिवसांच्या आत म्हणजेच दि. 16 सप्टेंबर 2025 पर्यंत वाचनालयाच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर भीमआर्मी तर्फे नगरपरिषदेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या परिसरात भिकमांगो आंदोलन उभारले जाईल.

या आंदोलनासाठी भीमआर्मीने सर्व समाज बांधव आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “आंबेडकर वाचनालय हे फक्त एक इमारत नसून आमच्या विचारांचा, आमच्या लढ्याचा आणि शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याचे काम थांबवणे आम्हाला मान्य नाही. कामाला त्वरित सुरुवात झाली नाही तर तीव्र आंदोलन करून प्रशासनाला जाग आणू,” असे भीमआर्मी वणी विधानसभा अध्यक्ष रविंद्र उर्फ बबलू मेश्राम यांनी सांगितले.

निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष हरीश पाते, रविंद्र कांबळे, पुखराज खैरे, देवाभाऊ पाटील उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();