भाविकावर काळाचा घाला, आटो पलटी होऊन अपघात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज शनिवारी 11.30 ते 12 वाजता च्या दरम्यान भीषण अपघात घडला. आटो अनियंत्रित झालेल्या या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमींना मार्डी येथे प्राथमिक उपचार करून वणी या तालुक्याच्या ठिकाणी नेताच अपघातातील एक महिला शोभा पत्रू दारुणकर (अंदाजे वय 65) हिचा मृत्यू झाला असून माया तुकाराम कडुकर (55) व जिया रमेश येसेकर (40) या दोन महिला गंभीर जखमी आहे. 

वनोजा देवी येथील अपघातग्रस्त आटो हा खैरी येथील देवदर्शनाला जात होता. त्यादरम्यान तालुक्यातील मार्डी ते बामर्डा दरम्यान दबलेल्या जागेला चुकविण्याच्या नादात 317 या महामार्गावर आटो पलटी होऊन भीषण अपघात झाला. 
भाविकावर काळाचा घाला, आटो पलटी होऊन अपघात भाविकावर काळाचा घाला, आटो पलटी होऊन अपघात Reviewed by सह्याद्री चौफेर on March 15, 2025 Rating: 5
Powered by Blogger.