सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील सामाजिक कार्यकर्ता सतीश बाबुलालजी गेडाम यांचे आज शनिवारी सकाळी 8 वा. निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 46 वर्षाचे होते.
स्व. सतीशदादा गेडाम यांनी वणी उपविभागीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे ऍम्ब्युलन्स ची सेवा दिली. सर्वांना परिचित झालेले गेडाम दादा यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, आदराने सर्वांची मने जिंकली होती. सर्व जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन मानव धर्म जोपासत माणसांना मदतीचा हात म्हणून 'राजे ऍम्ब्युलन्स'ची सेवा निर्माण केली. मात्र, स्व.सतीशदादा गेडाम हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. आज सकाळी 8 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आज दि. 15 मार्च ला दुपारी 4 वाजता गणेशपूर येथील मोक्षधाम वर अंतिम संस्कार होणार आहे. असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
सतीशदादा गेडाम यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 15, 2025
Rating: