विवाहित तरुणाने घेतला "जन्मदिनी" गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगावच्या क्लब येथे घडली आहे. आज रविवारी दुपारी 2.15 च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. 

नवीन मोतीगिरी बामणे (वय 35) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. नवीन याच्या पाठीमागे पत्नी व दोन वर्षाची चिमुकली आहे. विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस देखील होता, आणि त्याने जन्मदिनीच आपली जिवन यात्रा संपवल्याने मारेगावात हळहळ व्यक्त होत आहे. 

मृतक नवीन याचे वडीलांचे छत्र हरवल्याने लहानपासून मोठ्या वडिलांनी त्याचे पालणपोषण केले होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, आपल्या जन्मदिनी एका नामांकित क्लब मधील तिसऱ्या मजल्यावर त्याने गळफास घेतल्यामुळे विविध चर्चेला उधाण आले असून अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहेत.
Previous Post Next Post