Top News

कोसारा पुलारून पाणी: खैरी कोसारा ते माढेळी मार्ग बंद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात शनिवारी रात्रभर पाऊस कोसळला. शहरासह ग्रामीण भागाला बेभानपणे झोडपून काढणा-या पावसाने घरादाराची मात्र फार माया केली नाही. तालुक्यात शनिवारी (ता.३१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास दणक्यात सुरू झालेला पाऊस ठिकठिकाणी रात्रभर कोसळला. 

तालुक्याला चिंब भिजवत पावसाने पुन्हा खैरी कोसारा ते माढेळी वरोरा मार्ग बंद पडला. मिळालेल्या माहितीनुसार कोसारा ते माढेळी वर्धा नदी दुथळीभरून वाहत असल्यामुळे पुराचे पाणी कोसारा पुलावरून नुकतेच ओसंडून वाहू लागले आहे. रात्री मुसळधार पाऊस कोसळला असल्याचे येथील उपसरपंच सचिन पचारे यांनी सांगितले असून खैरी कोसारा ते माढेळी मार्ग सध्या बंद आहे. कोणीही या मार्गांवर येण्याचा व जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान या मार्गांवरील वाहतूक तूर्तास ठप्प असून पाणी स्थिर असून पूर उतरण्याची वाट प्रवाशी पाहत आहे.
तालुक्यात मान्सून सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. पावसाचा लपंडाव यामुळे शेतकरी हैराण झाले.

Post a Comment

Previous Post Next Post