मुलांची माहिती दडवणे सरपंचाला भोवले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : सन‌ २०२२ मध्ये पार पडलेल्या खापरखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत मुलांची माहिती दडवून निवडणूक लढवणे सरपंचाला भोवले असुन अप्पर जिल्हाधिकारी, अमरावती यांनी खापरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच रामभाऊ सज्जुलाल पटेल यांस अपात्र घोषित केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उभे राहता येत नाही. परंतु गंभेरी येथील रामभाऊ सज्जुलाल पटेल यांना चार मुले असतानाही सन २०२२ मध्ये ग्राम पंचायत खापरखेडा च्या सरपंच पदांची निवडणुक लढविली होती. या निवडणूकीत रामभाऊ सज्जुलाल पटेल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना मुलांची माहिती दडवून आपले नामांकन दाखल केले होते व विजयी झाले होते. मुलांची माहिती दडवून सरपंच पदावर निवड झाल्याने खापरखेडा येथील किशोर रामकिशन जांभेकर यांनी ॲड निखिल भि. सायरे यांचेमार्फत अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सरपंच पदाचे अपात्रता प्रकरण दाखल केले होते. 

प्रस्तुत प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. सायरे यांनी दाखल केलेले पुरावे तसेच लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेऊन अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिनांक २८/०८/२०२४ रोजीच्या आदेशानुसार किशोर जांभेकर यांचा अर्ज स्विकारुन रामभाऊ सज्जुलाल पटेल यांना ग्रामपंचायत खापरखेडा ता. धारणी जि. अमरावती येथील सरपंच पदाकरीता अपात्र घोषित केले आहे. 


मुलांची माहिती दडवणे सरपंचाला भोवले मुलांची माहिती दडवणे सरपंचाला भोवले Reviewed by सह्याद्री चौफेर on September 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.