रात्रीचा मुसळधार पाऊस,वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट; शहर जलमय ग्रामीण घरांची परझड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस वेगवान वारा व अस्मानी विजेच्या कडकडाटाने सर्वसामान्यांची पुरती धांदल उडाली. अनेकांच्या शेतात व घरात पाणी जमा झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने शहरासह ग्रामीण भागातील घरे जलमय झाले. मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील दोन घरांची पडझड होत जमीनदोस्त झाल्याने किमान लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

तालुका प्रशासनाने दखल घेवून तत्काळ आर्थिक सहाय्य करण्याची मागणी नुकसानग्रस्तानी केली आहे.

वणी तालुक्यातील वांजरी येथील एका युवकाची दुचाकी पुराणे वाहून गेली. मात्र, युवकाने स्वतः चा बचाव करित कसे बसे गाव गाठले आज सकाळी पाण्यात वाहून गेलेली दुचाकी झुडुपात अडकून होती तीला बाहेर काढण्यात आले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा धक्कादायक प्रकार वणी नांदेपेरा बायपास वरील नांदेपेरा रोडवरचा आहे. दरम्यान रात्री वणी नांदेपेरा मार्ग काही काळ ठप्प पडला होता.
रात्रीचा मुसळधार पाऊस,वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट; शहर जलमय ग्रामीण घरांची परझड रात्रीचा मुसळधार पाऊस,वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट; शहर जलमय ग्रामीण घरांची परझड Reviewed by सह्याद्री चौफेर on September 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.