टॉप बातम्या

सिनेअभिनेत्री माधुरी पवार हिच्या नृत्याने वणीकरांना पडली भुरळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मनसे दहीहंडी उत्सव आधुनिक जल्लोषात आणि उत्साहाने भरभराटीला येत असून, वणीमध्ये नव्याने समृद्ध परंपरा आणि प्रथा दर्शवत असल्याचा प्रत्यय काल शुक्रवारी (ता. 30) ला आला. अभूतपूर्व प्रतिसाद बघता नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव शासकीय मैदान येथे उत्सहात पार पडला आहे. 
शहराची आधुनिक प्रगती असूनही, परंपरा आणि उत्सव यांचे हे मिश्रण वणीचा चैतन्यशील सांस्कृतिक वारसा अधोरेखित करते. गोपाळकाला पर्वावर वणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडीची विशेष उपस्थिती मराठी सिनेअभिनेत्री हे एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामुळे उत्सवाला चार चांद लागतात. यावेळी सिनेअभिनेत्री माधुरी पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. माधुरी पवार यांच्या हस्ते, राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत बक्षीस गोविंदा पथकांना देण्यात आले. दरम्यान सिनेअभिनेत्री माधुरी पवार हिच्या नृत्याने वणीकरांना भुरळ पडली. 
मागील वर्षां देखील या दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळला होता. यावर्षीही मनसे दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शवून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मनसे नेते राजु उंबरकर यांनी ह्या दहीहंडी उत्सवाची संकल्पना वणी शहरात रुजवून उत्साही गोविंदासाठी आपली प्रतिष्ठा कायम राखत, मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अल्पभुदारक शेतकऱ्यांसाठी मोफत बि -बियाणे वितरण करण्याची घोषणा केली. या लक्षणीय उत्सवात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व उत्साहीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Previous Post Next Post