सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
उमरखेड : रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांनी १५ ऑगस्ट रोजी सिन्नर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यामुळे भारताचे नव्हे तर जगा भरातील मुस्लिम समाजाचे भावना दुखाविल्या गेल्याने राज्यभर आंदोलन व निषेध करत रामगीरी महाराजाला अटक करण्याची मागणी केली होती.
या वादग्रस्त वक्तव्यामुळे उमरखेड शहरातील मुस्लिम समाजाने सुध्दा दिनांक १७ ऑगस्ट रोजी उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे पोलीस स्टेशन झालेल्या शांतता कमिटी बैठकीत मुस्लिम समाजाने बहिष्कार घातला होता. तसेच असहकार आंदोलनचा पवित्रा घेतल्याने यवतमाळजिल्हाचे पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी दखल घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक जगताप साहेबांना उमरखेड येथे पाठविले मुस्लिम अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि मुस्लिम समाज बांधवामध्ये चर्चा झाली चर्चेअंती समज गैरसमज दूर करून गुन्हा दाखल करून एफ. आय. आर. दिले यानुसार काल दिनांक ३० ऑगस्ट रोजी राम गिरी महाराजांवर गुन्हा दाखल केला.
अश्लील भाषेत अवमान केल्याप्रकरणी, दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ (१), १९७, २९९, ३०२, ३५३(१) ब, ३५३(२) आदि कलमान्वेय उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रामगिरी महाराजांवर अखेर उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2024
Rating: