सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : डॉ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय क्रीडा दिनांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वरोरा-भद्रावती मॅरेथॉन 2024 स्पर्धेत भूमिका अशोक ढोके (कानडा,ता. मारेगाव) या आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींने १४ वयोगट स्पर्धेत ३ क्रमांक पटकावला आहे.
यामध्ये भूमिका ढोके, हिने तृतीय क्रमांक पटकावला, या १४ वयोगट स्पर्धेत ती तृतीय आली आहे. १ सप्टेंबर २०२४ ला वरोरा-भद्रावती मॅरेथॉन स्पर्धेत, खुला गट, १४ वयोगट, व १८ वयोगट असा तीन गटाचा समावेश होता. तीची १४ वयोगटात निवड झाली होती, त्यात भूमिकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
एक हजार रुपये रोख, मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ती आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व आईवडिलांना देते. तीच्या यशाचे सर्वत्र अभिनंदनसह कौतुक करण्यात येत आहे.
राष्ट्रीय विद्यालय हिवरा, भुमिका ढोकेचे यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2024
Rating: