स्व. मारोती रोगे व स्व सुनंदाबाई रोगे स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव येथे पाणपोई सुरु

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मार्च महिना लागताच नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. विविध कार्यक्रम,लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने मारेगावात वाटसरुंची गर्दीही वाढली आहे. अशातच नागरिकांची तहान भागवण्यासाठी मारेगाव पोलीस वेलफेअर पेट्रोल पम्प येथे स्व. मारोती रोगे व स्व. सुनंदाबाई रोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ठाणेदार संजय सोळंके यांच्या विशेष मार्गदर्शनात उपनिरीक्षक जाधव यांनी या पाणपोईचे उदघाटन केले. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता दयाल रोगे यांच्या पुढाकाराने व आईवडील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.यावेळी पोलीस दल, होमगार्ड, व पेट्रोल पम्प कर्मचारी उपस्थित होते.
    

स्व. मारोती रोगे व स्व सुनंदाबाई रोगे स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव येथे पाणपोई सुरु स्व. मारोती रोगे व स्व सुनंदाबाई रोगे स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव येथे पाणपोई सुरु Reviewed by सह्याद्री चौफेर on March 17, 2025 Rating: 5
Powered by Blogger.