अपघातात तीस वर्षीय युवकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : अपरिचित आडवं जनावरं आले आणि तीस वर्षाच्या युवकाचा अपघात होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना रविवारी 16 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी ते नांदेपेरा मार्गांवर घडली. या घटनेने वांजरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राहूल सुरेश धांडे रा. वांजरी असे मृतकाचे नाव आहे. तो दुचाकी क्र. (एम एच 29-सी डी, 5247) ने वणीवरून वांजरी या आपल्या गावी परतत असताना वणी ते नांदेपेरा मार्गांवर,ठेंगळे यांचे घरा नजीक अनोळखी जनावर आडवं आल्यामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले व हा जनावर आणि मोटारसायकलच्या धडकेत सायंकाळी साडे सात वा.अपघात घडला. यात राहुलला जीव गमवण्याचीही वेळ आली. त्याच्या डोक्यात मुका मार लागल्याने तो ठार झाला. याबाबत वणी पोलिसात माहिती देण्यात आली. 

सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. 
अपघातात तीस वर्षीय युवकाचा मृत्यू अपघातात तीस वर्षीय युवकाचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on March 17, 2025 Rating: 5
Powered by Blogger.