हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : दिनांक 23 जानेवारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद शाळा क्रमांक 8 येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनोद  मोहितकर, वणी तालुक्याचे तालुकाप्रमुख किशोर नांदेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख ललित लांजेवार, शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार तथा शिवसेनेचे सुनील डोंगरे, गिरीश सातपुते, महेश कुचेवार, प्रेम ढवळे, अमृत पुरी, शरद गेडाम, बबन दांडेकर, अशोक नागभिडकर, वैभव सिडाम, सुमित केसवानी, राहुल पालकवार, स्वप्निल चांदेकर, भाऊराव पाचवे, संदेश भोयर, प्रवीण वासेकर, राहुल उपाते, यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नगरपरिषद शाळा क्रमांक आठ चे शिक्षक वृंद उपस्थित होते. 

सर्वप्रथम नांदेपेरा रोड स्थित शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकला अभिवादन करून पुढील कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन, व आभार प्रदर्शन श्री देवेंद्रजी खरवडे सर यांनी केले.

सौ. इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : आदिवासी के तीन कप्तान 'गोंड कोलाम और प्रधान' हा परिवर्तनाचा विचार घेवून शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे संविधानात्मक मार्गाने शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करीत असून अन्नू पोड वरील कोलाम समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या वन जमिनीबाबत तहसिल कार्यालय बंद करुन आंदोलन केले, कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी रायपूर येथे पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण केले. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आदिवासी विकास विभागाला 100 दिवसाचा आढावा दिला असून वन हक्क पट्टया च्या आधुनिक तंत्र ज्ञानाच्या साहाय्याने जतन करण्याचे निर्देश आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांना निर्देश दिले, परंतू ज्यांना पट्टा च मिळाला नाही त्याचं काय? असा प्रश्न सरकारला विचारण्यासाठी जिल्हाभर जबाब दो आंदोलन करुन सुद्धा त्याकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याची भूमिका सौ. इंदिरा बोंदरे यांनी घेतली असून पालक मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात कोलाम समाजाची बैठक आयोजित करून सौ. इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही दिला यावेळी शामादादा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश गाडेकर कोलाम समाजाचे युवा नेते लक्ष्मण आसोले यांनी समर्थन घोषित केले.

मनसेने स्केटिंग पटू मनस्वीचे वणी नगरीत केले जंगी स्वागत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : बोटोणी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज '३० कि.मी. स्केटिंग फॉर युवा' बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटरचे अंतर स्केटिंग करून गाठले आहे. याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या वतीने शहरातील छत्रपती चौकात तिचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. 

३० कि. मी. स्केटिंग फॉर युवा अंतर्गत आज मनस्वीने मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथून सकाळी ८.०० वाजता स्केटिंग साठी सुरूवात करून यवतमाळ ते वणी महामार्गावरून हे ३० कि. मी. चे अंतर अवघ्या २ तासात पार केले. या स्केटिंग दरम्यान तिचे गावोगावी स्वागत करण्यात आले. ८.३० वाजता मनस्वी ने मारेगाव गाठल्या नंतर तिचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानंतर तिने वणीकडे प्रस्थान केले. 

मनस्वीने बाल वयातच पराक्रमाचं उंच शिखर गाठलं आहे. तिने आपल्या पराक्रमाने गाव व तालुक्याचं नाव उंचावलं आहे. कुणालाही हेवा वाटावा असं कर्तृत्व तिनं केलं आहे. स्केटिंगमध्ये १०४ सुवर्ण पदकं पटकावणारी मनस्वी तरुण पिढीला संदेश देण्याकरिता व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता बोटोणी वरून वणी येथे स्केटिंग केले. तिच्या जिद्द व पराक्रमाचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाल स्केटिंग पटूचं शहरात भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी हुरहुन्नरी व कर्तबगार मुलामुलींना यशस्वी वाटचालीकरता नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मनस्वीने कमी वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याबद्दल तिचे अभिनंदन करतांनाच ती यशाचे नवनवीन शिखर गाठत राहावी, याकरिता उंबरकर यांनी शहरातील छत्रपती चौकात फटाक्याची आतिष बाजीत भव्य दिव्य स्वागत करून तिला शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर यापुढे मनस्वीला तिच्या क्षेत्रांत कुठचीही अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या सोबत खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही दिली.

 तिने याआधी बोटोणी ते मारेगाव हे १२ किमी नंतर स्केटिंग करून पार केले होते. आई - वडिलांच्या या मेहनती बद्दल आणि तिला या शिक्षणाचे धडे दिल्याबद्दल प्रशिक्षक प्रशांत मल यांचे सुद्धा मनसेने आभार व्यक्त केले. तर या स्वागत समारंभात रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटी वणीने सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन मनस्वीचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. 

या प्रसंगी मनसेचे माजी सभापती धनंजय त्रिंबके, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, फाल्गुन गोहोकार, रुपेश ढोके, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, राजू बोदाडकर, रणजीत बोंडे, सौ. सिंधू बेसकर, वैशाली तायडे, सौ. स्नेहा विशाल पिंपरे, मेघा तांबेकर, अंकुश बोढे, गुड्डू वैद्य, गितेश वैद्य, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, उदय खिरटकर, वसंता घोटेकर, धीरज पिदुरकर, अमर राजूरकर, गोवर्धन पीदुरकर, गजानन बोंडे, विनोद गोहोकार, स्वप्निल कांबळे, प्रतिक बुरडकर, संस्कार तेलतुंबडे, कृष्णा कुकडेजा, तर रोटरी क्लबचे अध्यक्ष परेश पटेल, उपाध्यक्ष अश्विन कोंडावार, सचिव धवन अग्रवाल, निकेत गुप्ता, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार, आशिष गुप्ता यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामारकर तर आभार शुभम पिंपळकर यांनी व्यक्त केले.

वक्तृत्व स्पर्धा संपन्न...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सागर झेप बहुउद्देशीय संस्था, संस्कार भारती समिती व जैताई देवस्थान द्वारे भारत माता पूजन उत्सवानिमित्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा विषय 'नव्या पिढीचे भविष्य' असून वणी परिसरातील वीस शाळांनी सहभाग घेतला होता. 

या स्पर्धेत वर्ग आठ ते बारा विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व शैली दाखवली. या स्पर्धेत जैताई देवस्थान चे अध्यक्ष माधव सरपटवार, सागर मुने, व स्पर्धेचे परीक्षक प्रा. गजानन अघळते, लक्ष्मण इद्दे, सुषमा खंगण यांनी भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. 

प्रस्तविक सागर मुने, संचालन प्रवीण सातपुते व आभार उमाकांत म्हसे यांनी केले असून स्पर्धेचे संचालन माही खुसपुरे हिने केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ सोनटक्के, राजू खुसपुरे, रजनी पोयाम, तेजेश्वर खुसपुरे, अशोक सोनटक्के, सोनाक्षी खुसपुरे, नारायण मांडवकर, मनोज उरकुडे, संदीप आस्वले, जैताई देवस्थान, राजू तुरणकर, लक्ष्मीकांत हेडाऊ यांचे सहकार्य विशेष लाभले.

वणीत युवासेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : हिंदूहदयसम्राट वं.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त आज (ता. 23) ला सकाळी 7 वाजता शिवतिर्थावर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदरशनाखाली युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना हारार्पण व अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात केली.

या स्पर्धेत मुलामुलींचे ओपन गट मुले/मुली व 16 वर्षा खालील मुले-मुली असे चार गटात विभागणी करण्यात आले होते. मुलांच्या गटातून क्रिश सचिंद्र मिस्त्री याने पहिला क्रमांक पटकावले, दुसरे ओम विश्वजीत गारघाटे तर तिसरे बक्षिस कुणाल विठ्ठल तोडासे व चौथे बक्षिस रोहित दादाजी ढेंगळे यांनी पटकावले आहे. मुलींच्या ओपन गटातून पहिले बक्षीस अंजली देवराव पचारे, दुसरे गायत्री मंगेश खोंडे, तिसरे बक्षीस अस्मिता मनोज वाळके व चौथे बक्षिस आचल संदीप झिले हिने पटकावले. तसेच 16 वर्षा आतील मुलांच्या गटातून निल शंकर नाने याने प्रथम बाक्षिस पटकाविले. दुसरे हसन सय्यद तर तिसरे शिवम भोलेनाथ ओझा, तर चौथे बक्षिस वीर गुलाब तांबेकर यांनी तसेच 16 वर्षा आतील मुलींच्या गटातून प्रथम बक्षिस वैष्णवी दिनेश मेश्राम, दुसरे श्रुती बापूराव मडावी, तर तिसरे बक्षिस शिल्पा लक्ष्मण आत्राम, चौथे बक्षिस प्रांजली विलास डोहे यांनी पटकावले आहेत. 
यावेळी विजेत्यांना रोख रक्कम देऊन स्पर्धेमध्ये सर्वात लहान धावपटू मुले व नाझिया मिर्झा ऑल इंडिया चॅम्पियन औरंगाबाद यांना पारितोषिक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान,वणी शहरातील स्केटिंग स्पर्धकांनी  स्केटिंग चे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली.  याप्रसंगी त्यांचे शिवसेना युवासेनेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विदर्भ कन्या स्केटिंग पटू मनस्वी चा सत्कार 
तरुण पिढीला संदेश व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता विदर्भ कन्या स्केटिंग पटू ही बोटोणी ते वणी हे 30 किमी अंतर स्केटिंग करत वणी शहरात साडे अकरा वाजता वं. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे दाखल झाली. तिचा युवासेने च्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट वं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मनस्वी सह आई वडिलांनी अभिवादन केले. शिवसेना युवासेने तर्फे अगदी लहान वयात स्केटिंग मध्ये 104 पदक पटकावणारी मनस्वीच्या आईवडिलांचा देखील सन्मान केला. 
यावेळी समाजसेविका किरणताई संजय देरकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, माजी शिवसेना शहर प्रमुख राजु तुरणकर, चिखलगाव सरपंच रुपालीताई कातकडे, सुरेखा ढेंगळे, माधुरी सुंकुरवार, मिनाक्षी मोहिते, प्रकाश कऱ्हाड, क्रीडाप्रशिक्षक महेश पहापले, संतोष बेलेकर, गणेश मोहितकर, जगदीश ठावरी, आनंद घोटेकर, सुरेश शेंडे, संजोग झाडे, तुळशीराम काकडे, प्रविण खानझोडे, मिलिंद बावणे, मंगल भोंगळे, मनीष बत्रा, गणेश जूनगरी, चेतन उलमले, विवेक ठाकरे, व सूरज चाटे आदी उपस्थित होते.