सौ. इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : आदिवासी के तीन कप्तान 'गोंड कोलाम और प्रधान' हा परिवर्तनाचा विचार घेवून शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे संविधानात्मक मार्गाने शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करीत असून अन्नू पोड वरील कोलाम समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या वन जमिनीबाबत तहसिल कार्यालय बंद करुन आंदोलन केले, कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी रायपूर येथे पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण केले. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आदिवासी विकास विभागाला 100 दिवसाचा आढावा दिला असून वन हक्क पट्टया च्या आधुनिक तंत्र ज्ञानाच्या साहाय्याने जतन करण्याचे निर्देश आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांना निर्देश दिले, परंतू ज्यांना पट्टा च मिळाला नाही त्याचं काय? असा प्रश्न सरकारला विचारण्यासाठी जिल्हाभर जबाब दो आंदोलन करुन सुद्धा त्याकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याची भूमिका सौ. इंदिरा बोंदरे यांनी घेतली असून पालक मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात कोलाम समाजाची बैठक आयोजित करून सौ. इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही दिला यावेळी शामादादा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश गाडेकर कोलाम समाजाचे युवा नेते लक्ष्मण आसोले यांनी समर्थन घोषित केले.
सौ. इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी सौ. इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2025 Rating: 5
Powered by Blogger.