सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सागर झेप बहुउद्देशीय संस्था, संस्कार भारती समिती व जैताई देवस्थान द्वारे भारत माता पूजन उत्सवानिमित्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा विषय 'नव्या पिढीचे भविष्य' असून वणी परिसरातील वीस शाळांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत वर्ग आठ ते बारा विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व शैली दाखवली. या स्पर्धेत जैताई देवस्थान चे अध्यक्ष माधव सरपटवार, सागर मुने, व स्पर्धेचे परीक्षक प्रा. गजानन अघळते, लक्ष्मण इद्दे, सुषमा खंगण यांनी भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
प्रस्तविक सागर मुने, संचालन प्रवीण सातपुते व आभार उमाकांत म्हसे यांनी केले असून स्पर्धेचे संचालन माही खुसपुरे हिने केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ सोनटक्के, राजू खुसपुरे, रजनी पोयाम, तेजेश्वर खुसपुरे, अशोक सोनटक्के, सोनाक्षी खुसपुरे, नारायण मांडवकर, मनोज उरकुडे, संदीप आस्वले, जैताई देवस्थान, राजू तुरणकर, लक्ष्मीकांत हेडाऊ यांचे सहकार्य विशेष लाभले.
वक्तृत्व स्पर्धा संपन्न...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 24, 2025
Rating: