भारतीय कम्युनिस्ट पक्ष झरीजामणी तालुक्याचे त्रेवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झरीजामणी तालुका त्रैवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न झाले. अधिवेशनाला जिल्हा सहसचिव कॉ.बंडु गोलर व तालुका सचिव कॉ.वासुदेव गोहणे मार्गददर्शक म्हणुन उपस्थित होते. 

अधिवेशनाला झरी जामणी तालुक्यातील 11 शाखेचे पदाधिकारी 40 पुरुष दहा महिला हजर होत्या.याप्रसंगी 51 सदस्यीय तालुका कौन्सिल निवडण्यात आली. कॉम्रेड वासुदेव गोहणे यांची तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली. 

तालुका सहसचिव म्हणून भवानी गेडाम व पुंडलिक गाडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शेतमजूर युनियन प्रभारी तालुका सचिव म्हणून सुधाकर गोहणे यांची निवड करण्यात आली. ए.आय.एस.एफ.प्रभारी तालुका सचिव सचिन गोहणे यांची निवड करण्यात आली.तालुका कौंसिल सदस्य म्हणुन पोतू कुमरे, बापूराव आत्राम, ईश्वर गाडगे, गजानन गेडाम, ईश्वर गाडगे, रमेश कुडमेथे, लक्ष्मण आत्राम, दौलत मडावी, शत्रुघन कुचनकार, रमेश टेकाम, रुखमा कुमरे, रामूबाई आत्राम, रामदास कुमरे यांची निवड करण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज चौक वणी येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सर्व गटा करीता प्रथम बक्षीस ३००० हजार रुपये, द्वितीय बक्षिस २००० हजार रुपये, तृतीय बक्षीस १५०० रुपये,चतुर्थ बक्षिस १००० रुपये असणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या १० स्पर्धेकास मोमेंटो देण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक अजिंक्य शेंडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख यांनी केले आहे. 

तसेच स्पर्धे नंतर स्केटिंग मध्ये १०४ पदक पटकावणारी बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटर अंतर स्केटिंग करून वणी येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ येणार आहे.तीचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या कडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे.तरी या दोन्ही कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मनस्वी पिंपरे करणार बोटोणी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : १०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर स्केटिंग करून गाठणार आहे. तिच्या स्केटिंगमधील शौर्याचे जिद्दीचे कौतुक वणी व मारेगाव येथे होत आहे. सध्या मनस्वी पुणे येथे राहत असून तिने रोलर स्केटिंगमध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

ती जगातील सर्वात लहान गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट 2021, नॅशनल स्केटिंग चॅम्पियन 2023 आणि नुकतेच सुवर्ण पदकाचे शतक पूर्ण केले आहे.

26 जानेवारी 2024 रोजी मनस्वीने बोटोणी ते मारेगाव 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' अभियानाकरिता सलग 12 किमी. स्केटिंग केले होते..

आपल्या भागातील तरुणांना आपल्यापासून प्रेरणा मिळावी व त्यांचा जास्तीत जास्त कल खेळाकडे वळावा, याकरिता गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमीचे अंतर स्केटिंगद्वारे पूर्ण करून 'स्केट फॉर युवा' असा प्रेरणात्मक संदेश मनस्वी देणार आहे.

स्केटिंग रॅलीची सुरुवात बोटोणी येथून गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. तर १०.३० ते ११.०० च्या दरम्यान या रॅलीचे वणीत आगमन होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रॅलीच्या भव्य दिव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. तर मनसे पक्ष नेते राजू उंबरकर हे मनस्वीचे स्वागत करणार आहेत. 

यावेळी मुख उपस्थितीमध्ये आमदार संजय देरकर, माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, गौरीशंकर खुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, मारेगावचे तहसिलदार उत्तम निलावाड, ठाणेदार संजय साळुंके, आशिष कुळसंगे, बलदेव खुंगर, संजय खाडे, बोटोनी येथील सरपंचा सुनिता जुमनाके, सुनील गेडाम प्रवीण वणकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे. स्केटिंग रॅलीदरम्यान मनस्वीचे प्रशिक्षक विजय मलजी हे मनस्वीला विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

स्केटिंग रॅलीचा समारोप वणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वणी येथे सकाळी 10.30 ते 11 वाजतादरम्यान होणार आहे. स्केटिंग रॅली यशस्वी करण्यासाठी बजरंग दल, गुरुदेव सेवा मंडळ, छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान, तथागत युवा मंडळ, माँ शेरा वाली क्रिकेट क्लब बोटोणी व बोटोणीवासींचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. कामगारांना पुन्हा कामावर रुजू करावे, या मागणीसाठी कामगारांनी कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. दिनांक 27 जानेवारीपासून कामावरून कमी केलेले कामगार कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार आहे. याबाबत कामगारांनी उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान कंपनीच्या या भूमिकेवर कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी कामगारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. ही कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी. उत्खननाचे काम करते. गेल्या 5 वर्षांपासून या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर सुरु आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या विरोधात कामगार सहकुटुंब आमरण उपोषण करणार आहेत. 27 जानेवारी स. 11 वाजेपासून कामगारांच्या उपोषणाला सुरुवात होत आहे. 


हा भूमिपुत्रांवर अन्याय - संजय खाडे 
वेकोलिसाठी स्थानिकांनी आपली जमीन दिली. शेती गेल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अनेक स्थानिकांचा रोजगार गेला. वेकोलिमुळे होणा-या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रदूषणाचा स्थानिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. वेकोलिला प्रगतीत भूमिपुत्रांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र वेकोलिसाठी काम करणा-या कंपन्या आता भूमिपुत्रांच्याच जिवावर उठल्या आहेत. हा भूमिपुत्रावरचा अन्याय सहन केला जाणार नाही. कंपनीने तात्काळ कामगारांना नोकरीवर रुजू करावे. 


याबाबत कामगारांनी उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देऊन कामावर रुजू करण्याची विनंती केली आहे. निवेदनावर प्रभाकर खोब्रागडे, संजय पारशिवे, कान्हू तामगाडगे, महेश गोवरदिपे, अनिल डोंगे, योगेश कामतवार, प्रकाश इंगोले, सुरेश पारशिवे, वासुदेव चिडे, किसन खेडेकर, अरुण डाहूले, प्रवीण कातरकर, श्रीकांत निंदेकर, संजय व-हाटे, प्रकाश नागोसे, रवि गुरनुले, संदीप नांदे, संजय वासनकर, आकाश गोबाडे, तुळशीदास धांडे, सुनील कातरकर, विजय खुटेमाटे, दिलिप काकडे, गणेश सातपुते, भाऊराव काकडे, मिथून निब्रड, विशाल गोवारदिपे, पुरुषोत्तम पाचभाई, राजू ढपकर, वैभव खाडे, हरिभाऊ खेडेकर, संतोष राजूकर, अनिल बोबडे, अरुण असिनकर, दीपक खुसपुरे, सुभाष पिंगे, गणेश पारशिवे, मंगेश देरकर इत्यादींची स्वाक्षरी आहे.

आशा व गटप्रवर्तक संघटना (सिटू) चे पहिले तालुका अधिवेशन वणी येथे संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : "जनतेचा आरोग्याचा प्राथमिक दुवा असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांना मात्र आपल्या कष्टाचे दाम प्राप्त करण्यासाठी शासनाशी भांडावे लागते आहे. यासाठी CITU संघटना अग्रेसर राहून संघर्ष करीत आहे. सिटू ही कामगार संघटना समाजातील सर्वच कामगारांचा प्रश्नावर लढणारी देशपातळीवरील सर्वात मोठी संघटना आहे आणि आशा व गटप्रवर्तकांना त्यांचे हक्काचे दाम मिळविण्यासाठी एकमेव संघटना आहे", असे प्रतिपादन आशा व गटप्रवर्तक संघटना (सिटू) च्या पहिल्या वणी तालुका अधिवेशन प्रसंगी उद्घाटक म्हणून कॉ. ॲड. दिलीप परचाके यांनी केले. 

ह्या पहिल्या वणी तालुक्याचा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशा व गटप्रवर्तक संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.सरिता दानव उपस्थित होत्या. 

अधिवेशनाचा सुरुवातीला लाल झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर शहिदांना व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर तालुक्याचा संघटनेचा अहवाल कॉ. प्रीती करमनकर यांनी मांडला. ह्यावर चंदा मडावी, मेघा बांडे, कुंदा देहारकर, ताई डोंगरे, मीनाक्षी थेरे यांनी आपली मते मांडून अहवालाला पाठिंबा दिला. अध्यक्षपदावरून बोलताना कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी संघटनेचे महत्त्व विषद केले तर कॉ. सरिता दानव यांनी संघटना वाढी साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

कॉ. उषा मूरखे यांनी आशांना त्यांचा प्रश्नांवर का संघर्ष का करावे लागते हे विषद करून ९ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा अधिवेशनाची माहिती दिली. या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी १३ सदस्यीय तालुका कमिटी निवडण्यात आली. अध्यक्षपदी कॉ. मेघा बांडे, उपाध्यक्ष पदी कॉ. जयश्री सोनटक्के, सचिवपदी कॉ. सुनिता डवरे, सहसाचिवपदी कॉ. वर्षा गोवारदिपे, संघटकपदी कॉ. मीनाक्षी थेरे तर कॉ. निशा रामटेके, कॉ. पायल नालमवार, कॉ. ईशा भालेराव, कॉ. चंदा पथाडे, कॉ. शुभांगी डोंगरे, कॉ. किरण बोंसुले, कॉ. रंजना डांगे, कॉ. शीला नळे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

अधिवेशनाला तालुक्यातील अनेक गावातील आशा व गट प्रवर्तक यांची उपस्थिती होती.