सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : १०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर स्केटिंग करून गाठणार आहे. तिच्या स्केटिंगमधील शौर्याचे जिद्दीचे कौतुक वणी व मारेगाव येथे होत आहे. सध्या मनस्वी पुणे येथे राहत असून तिने रोलर स्केटिंगमध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
ती जगातील सर्वात लहान गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट 2021, नॅशनल स्केटिंग चॅम्पियन 2023 आणि नुकतेच सुवर्ण पदकाचे शतक पूर्ण केले आहे.
26 जानेवारी 2024 रोजी मनस्वीने बोटोणी ते मारेगाव 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' अभियानाकरिता सलग 12 किमी. स्केटिंग केले होते..
आपल्या भागातील तरुणांना आपल्यापासून प्रेरणा मिळावी व त्यांचा जास्तीत जास्त कल खेळाकडे वळावा, याकरिता गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमीचे अंतर स्केटिंगद्वारे पूर्ण करून 'स्केट फॉर युवा' असा प्रेरणात्मक संदेश मनस्वी देणार आहे.
स्केटिंग रॅलीची सुरुवात बोटोणी येथून गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. तर १०.३० ते ११.०० च्या दरम्यान या रॅलीचे वणीत आगमन होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रॅलीच्या भव्य दिव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. तर मनसे पक्ष नेते राजू उंबरकर हे मनस्वीचे स्वागत करणार आहेत.
यावेळी मुख उपस्थितीमध्ये आमदार संजय देरकर, माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, गौरीशंकर खुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, मारेगावचे तहसिलदार उत्तम निलावाड, ठाणेदार संजय साळुंके, आशिष कुळसंगे, बलदेव खुंगर, संजय खाडे, बोटोनी येथील सरपंचा सुनिता जुमनाके, सुनील गेडाम प्रवीण वणकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे. स्केटिंग रॅलीदरम्यान मनस्वीचे प्रशिक्षक विजय मलजी हे मनस्वीला विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
स्केटिंग रॅलीचा समारोप वणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वणी येथे सकाळी 10.30 ते 11 वाजतादरम्यान होणार आहे. स्केटिंग रॅली यशस्वी करण्यासाठी बजरंग दल, गुरुदेव सेवा मंडळ, छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान, तथागत युवा मंडळ, माँ शेरा वाली क्रिकेट क्लब बोटोणी व बोटोणीवासींचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
मनस्वी पिंपरे करणार बोटोणी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 21, 2025
Rating: