बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज चौक वणी येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सर्व गटा करीता प्रथम बक्षीस ३००० हजार रुपये, द्वितीय बक्षिस २००० हजार रुपये, तृतीय बक्षीस १५०० रुपये,चतुर्थ बक्षिस १००० रुपये असणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या १० स्पर्धेकास मोमेंटो देण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक अजिंक्य शेंडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख यांनी केले आहे. 

तसेच स्पर्धे नंतर स्केटिंग मध्ये १०४ पदक पटकावणारी बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटर अंतर स्केटिंग करून वणी येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ येणार आहे.तीचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या कडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे.तरी या दोन्ही कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 22, 2025 Rating: 5
Powered by Blogger.