सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
झरी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झरीजामणी तालुका त्रैवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न झाले. अधिवेशनाला जिल्हा सहसचिव कॉ.बंडु गोलर व तालुका सचिव कॉ.वासुदेव गोहणे मार्गददर्शक म्हणुन उपस्थित होते.
अधिवेशनाला झरी जामणी तालुक्यातील 11 शाखेचे पदाधिकारी 40 पुरुष दहा महिला हजर होत्या.याप्रसंगी 51 सदस्यीय तालुका कौन्सिल निवडण्यात आली. कॉम्रेड वासुदेव गोहणे यांची तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली.
तालुका सहसचिव म्हणून भवानी गेडाम व पुंडलिक गाडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शेतमजूर युनियन प्रभारी तालुका सचिव म्हणून सुधाकर गोहणे यांची निवड करण्यात आली. ए.आय.एस.एफ.प्रभारी तालुका सचिव सचिन गोहणे यांची निवड करण्यात आली.तालुका कौंसिल सदस्य म्हणुन पोतू कुमरे, बापूराव आत्राम, ईश्वर गाडगे, गजानन गेडाम, ईश्वर गाडगे, रमेश कुडमेथे, लक्ष्मण आत्राम, दौलत मडावी, शत्रुघन कुचनकार, रमेश टेकाम, रुखमा कुमरे, रामूबाई आत्राम, रामदास कुमरे यांची निवड करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष झरीजामणी तालुक्याचे त्रेवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 22, 2025
Rating: