धक्कादायक... नदीत उडी घेत असल्याचे कॅमेऱ्यात युवती झाली कैद; पटाळा पुलावरील प्रकार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक 5, घरकुल कॉलनी मध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय युवतीने वर्धा नदीत उडी घेत असल्याची धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकाराने तालुका हादरला आहे.

माधुरी खैरे (ता.मारेगाव) असे नदीत उडी घेतलेल्या युवतीचे नाव आहे. तीचे डी फार्म पर्यंत शिक्षण झाले असून वडीलअरुण खैरे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. तर जि. प. शाळेच्या शिक्षिका उषाताई खैरे ह्या मागील मार्च मध्ये केरकचरा जाळतांना पन्नास टक्के भाजल्या. दिड महिन्याच्या दीर्घ उपचारांनंतर त्यांचेही निधन झाले होते. 

काल शुक्रवारी सकाळी 10 वाजता वणी कॉलेज ला जात असल्याची भावाला सूचना करीत ही युवती वणीहून ऑटोरिक्षात बसून वरोरा मार्गे निघाली. दुपारी 12.30 वाजताचे सुमारास पाटाळा वर्धा नदी जवळ माधुरी हिने स्टॉप घेतला. काही वेळात माजरी येथील एक दाम्पत्य 'त्या' ठिकाणी थांबले असता त्यांना मोबाईल, पर्स व चप्पल निदर्शनास आली. यावेळी माधुरी हिच्या मोबाईलवर कॉल आला असतांना घटनास्थळवरील हकीकत नातेवाईकांना विषद केली. आणि नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेत सिसिटीव्ही फुटेज तपासाअंती माधुरी ही वर्धा नदीत उडी घेत असल्याचे स्पष्ट झाले. 

भाऊ यश खैरे याने वणी पोलीस प्रशासनात फिर्याद दाखल केली आहे. आई-वडील नसतांना आता बहिणीच्या टोकाच्या निर्णयाने एकुलता एक मुलगा एकाकी पडला आहे. 

यवतमाळात 'आरक्षण बचाव यात्रा'

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वंचित बहुजन आघाडी,यवतमाळच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जाहीर सभा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वाजता टिबंर भवन, धामणगांव रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन मारेगाव तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. 
महाराष्ट्रामध्ये मराठा व ओवीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर वळणावर येवून पोहोचला असून समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे. ओबीसीच्या कोट्यातुन मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे ह्या भुमिकेमुळे ओबीसींना मंडल आयोगानुसार मिळालेले आरक्षण घोक्यात आले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), राष्ट्रवादी (अ.प.ग.), शिवसेना (शिंदे), शिवसेना (उ.बा.ठा.), भाजपा या प्रस्थापीत पक्षातील ओबीसी नेते (काही अपवाद सोडून) ओबीसीच्या आरक्षणाबद्दल स्पष्ट भुमिका घेण्यास तयार नसुन आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणापुढे ते लाचार आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण समर्थनार्थ भुमिका घेणे ही त्यांची मुख्य अडचण आहे. अशा अवस्थेमध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये एकमेकांविषयी वैरभावना निर्माण झाली आहे. करीता ओबीसी समाजातील अनेक सामाजिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेवून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आपण हाताळावा अशी विनंती केल्यामुळे ओबीसींचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक हित दृष्टीसमोर ठेवुन अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या आरक्षणाबद्दल जन जागृती व अनुसूचित जाती जमाती यांच्या हितरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रभर "आरक्षण बचाव यात्रा" 4 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. 
सभेचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे :

• ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे.
• एस.सी, एस.टी.च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करा.
• ओबीसी विद्यार्थ्यांना एस.सी, एस.टी.च्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी.
• ओबीसींना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
• महाराष्ट्रातून १०० ओबीसी आमदार निवडून आणणे.

करीता सर्व आरक्षण समाज घटकांनी तसेच तालुक्यातील जनतेनी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांनी केले आहे. 

प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..


मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐
तुमच्या उत्तुंग भरारी बद्दल अभिनंदन. तुमची भविष्यातील साहसे तुमची अभियांत्रिकी कौशल्ये आणि ज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून अत्यंत कठीण परिस्थितीत परीक्षेत पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पालकांचे सुद्धा अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा! 
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील सुपुत्र 
प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- 
सौ. मयुरी चंद्रकांत धोबे 
सरपंच गौराळा, ता. मारेगाव 
श्री. चंद्रकांत धोबे 
माजी उपसरपंच, गौराळा ता. मारेगाव 

पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रफुल प्रभाकर भोयर यांचे हार्दिक अभिनंदन


साहेब...तुमच्या मेहनतीचे फळ तुला मिळाले.. तुमच्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदव्या आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! परीक्षा पास होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा..!
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील सुपुत्र प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- सुषमा रुपेश ढोके 
सरपंच : ग्रामपंचायत कानडा (पार्डी)
अध्यक्ष : रुपेश ढोके 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव 

पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रफुल भोयर यांचे हार्दिक अभिनंदन


अभिनंदन 💐💐

तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदव्या आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! परीक्षा पास होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे.
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील सुपुत्र, आमचा मान अभिमान प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (psi) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- खुशाल महादेव येरगुडे 
तालुका अध्यक्ष : ग्रामरोजगार सेवक संघटना, मारेगाव