जनतेचे समस्या सोडवण्यासाठी चालतं फिरतं जनहित केंद्र - संजय खाडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी येथे "चालतं फिरतं जनहित केंद्र" सुरू केल्यानंतर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज बुधवारी मारेगाव तालुक्यात काँग्रेस नेते संजय खाडे यांनी दौरा सुरू केला आहेत. यादरम्यान, मच्छिन्द्रा येथे भेट देऊन शेतकऱ्यासह नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

यावेळी जयसिंग गौरकार, संचालक रवि धानोरकर, माजी सरपंच तेजराज बोढे (गणेशपूर), अमोल कुमरे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, धीरज डांगाले, शामसुंदर मेश्राम ग्राम. पं सदस्य, गजानन कुमरे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

सध्या योजनेत नागरिकांना ऑनलाईन कामात अडचणी येत असलेल्या त्या सर्व समस्या अडचणी 'चालतं फिरतं जनहित केंद्रात समस्या ह्या गावात जाऊन सोडवल्या जातील अशी ग्वाही देत आपण दौरे सुरू केला आहेत. विठ्ठल बापूराव लांबट ह्या शेतकऱ्याचे वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पुर्णतः नुकसान झाले होते. त्यामुळे ते खूप मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. नैसर्गिक आपत्ती विभागातून मिळणाऱ्या मोबदल्याबद्दलची प्रक्रिया खूप क्लिष्ट असल्याकारणाने त्यांना याबद्दलची माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे त्या शेतकऱ्याने संजय खाडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. श्री.खाडे यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली व स्वतः संजय खाडे यांनी त्यांच्या मच्छिन्द्रा येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. केंद्रा"मार्फत त्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करून देण्यात आले आणि त्यांना 14400 रू. एवढा लाभ मिळवून देण्यात आला. पुढे काही अडचण आलीस तर संपर्क साधण्याचे सांगितले. 

यावेळी ग्रा. पं.सदस्य नथू गेडाम, कमलाकर सोयाम, ऋषी मत्ते, विलास जाधव, उमेश क्षीरसागर, विठ्ठल लांबट, अविनाश किनाके, गोविंदा डोंगे, नरेश बरडे,आदींसह गावातील आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचा मशाल मोर्चा तहसीलवर धडकला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी मतदार संघांचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात आज मंगळवारी दुपारी २.३० वाजता "भव्य मशाल मोर्चा" तहसील कार्यालयावर धडकला. मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. 

निवेदनातून दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खतांची आर्थिक मदत तातडीने जाहिर करावी, मागील वर्षीचा पिक विमा सरसकट देण्यात यावा, गेल्या वर्षी वर्धा नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या ११ गावांना वेगळी मदत देण्यात यावीत, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावीत, शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा,जर विद्युत पुरवठा केला नाही तर संपुर्ण कोल माईन्स बंद करण्यात येईल, घरगुती गॅसचे दर कमी करण्यात यावेत, घरगुती विजेचे प्रति युनिट दर कमी करण्यात यावेत, वन्यप्राण्यांचा हौदोस थांबवून शेतपिकांचे संरक्षण करण्यात यावेत, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील शहरी व ग्रामीण लाभार्थ्यांना ३ लाख रु. अनुदान करण्यात यावे. वाढ करून ते नियमित देण्यात यावेत, निराधार अनुदानात, पावसाळा सुरु झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात पुरेसा औषध साठा, रेबिज, स्नेक बाईट लस उपलब्ध ठेवण्यात याव्यात.
तसेच लॅब टेक्निशियन, डेंटिस्ट (दंत रोग तज्ञ) व एक्स रे मशिन त्वरीत उपलब्ध करण्यात यावीत, घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन देण्यात यावीत, मारेगांव येथील बस स्थानकाचे काम तातडीने सुरु करण्यात यावेत, क्रिडा संकुल उपलब्ध करण्यात यावेत, वणी मारेगाव झरी तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना त्वरीत पिक कर्ज देण्यात यावेत.अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने तालुक्यातील विविध मागण्या घेऊन मारेगाव येथील नगर पंचायत च्या प्रांगणातून मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी शिवसेनाचे सुनील कातकडे, संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, तालुका प्रमुख संजय आवारी, सुनील गेडाम,राजु मोरे, जीवन काळे, यांच्या सह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. 

ग्रामरोजगार सेवक लाचेच्या जाळ्यात अडकला

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बुद्रूक येथील ग्रामपंचायतच्या रोजगार सेवकाला गोठ्याकरिता शेतकऱ्याकडून 5000/- रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उमरखेड येथे ही कारवाई केली. 

गजानन बद्रीसिंग रत्ने (51) असे या ग्रामरोजगार सेवकाचे नाव असून, तो ग्रामपंचायत बिटरगाव बु. येथे कर्तव्यावर आहे. तक्रारदाराने 8 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लेखी तक्रारी वरून सोमवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता ग्राम रोजगार सेवक गजानन बद्रीसिंग रत्ने याने तक्रारदार यांच्या वडिलांकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना अंतर्गत ग्राम मन्याळी ता. उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळण्याकरिता केलेला अर्ज मंजूर करण्याकरिता 7000/- रूपये लाचेची मागणी केली. तसेच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यावरून सोमवारी सापळा रुचून हनुमान मंदिर प्रवासी थांबाच्या समोर उमरखेड ढाणकी बिटरगाव रोड, येथे लाच घेताना आरोपीला अटक केली. सदरची कारवाई गजानन जगताप माननीय पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ येथील पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ उत्तम नामवाडे यांनी व त्यांच्या टिमने केली.

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे केळापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा झरी, केळापूर तालुक्यातील बिगर सातबारा शेतकरी महिला पुरूषांनी सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा अहवाल बोलावून सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल पटवारी यांच्या मार्फत सादर करण्याचे निर्देश द्या, अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने 15 जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून केळापूर उपविभागीय अधिकारी यांना दिला. 

पुढें निवेदनात नमूद केले आहे की, दलीत, आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती साठी कब्जा केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून सन 2023 च्या खरिप हंगामात झरी तालुक्यातील मौजे रायपूर, दूर्भा, परसोडी, कमळवेली, देमाडदेवी, कोपामांडवी, रजनी, अर्धवण, उमरी सत्तपल्ली तसेच केळापूर तालुक्यातील मौजे पिंपरी बोरी, सुन्ना, वाऱ्हा कवठा, अडाणी, मुंजाला, सहित इतरही गावातील लोकानी पेरणी केलेल्या बाबत लेखी स्वरूपात मागणी केलेली असताना अहवाल सादर करण्यासाठी टाळाटाळ केली आहे. म्हणून पेरणी केलेली असताना पटवारी यांनी अहवाल सादर केला नसल्याचा आरोप निवेदनातून केला असुन मागील वर्षांच्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल पटवारी यांच्या मार्फत बोलावून यावर्षीचा अहवाल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे पटवारी यानी पंचनामे, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मौका पाहणी, करून पेरणी केलेल्या शेतकऱ्याच्या बायानाप्रमाणे वाहिती क्षेत्र फळासहित अहवाल सादर करण्याचे निर्देश द्या अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला.

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उर्कुडा गेडाम, सौ. इंदिरा बोंदरे, पुरुषोतम कोडपे, रामचंद्र मडावी, दिलीप मडावी, गंगांना रेड्डी, लक्ष्मण आत्राम, वासुदेव टेकाम, सहित बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या असंख्य महिला पुरुष उपस्थित होत्या.

विधान सभेच्या निडणुक होणार, पण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कधी!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : विधान सभेच्या निवडणुकीचे पडघम अवघ्या काही दिवसात वाजणार असून त्या निमित्ताने निवडणूक आयोग तयारीला लागला आहे. पण गेल्या काही वर्षापासुन जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवणुका झाल्या नसल्याने कार्यकर्त्यात नाराजीचा सुर पहावयास मिळत आहे. एक प्रकारे ग्रामीण भागातील विकास कामाला ब्रेक लागल्याने विकास आता भकाश झाल्याचे आढळून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती वर पदाधिकारी नसल्याने शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचा ही वचक उरला नसल्याचे मनमनीचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती एक प्रकारे विकासाचा पाया मानल्या जातो. कार्यकर्त्याना ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी बल मिळते तर, जिल्हा परिषद सदस्य यांना विकासाची कामे करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते, ईमारत व विविध प्रकारचे कामे या माध्यमातून केल्या जातात तर, पंचायत समितीच्या सभापतीचे लक्ष अनेक विभागाच्या कडून होणाऱ्या कामा वर असते. पण गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या नसल्याने ही पदे रिक्त आहेत. लोकप्रतिनि ही या निडणुकी कडे कानाडोळा करत असल्याने या निवडणुकांचा आता शासनालाही विसर पडल्याचे दिसून येत आहे. विधान सभेच्या निवडणुका पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यच्या निवडणुका जाहीर करण्यात याव्यात यासाठी जनता आग्रही भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. गत काही वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे काम रामभरोसे सुरु आहे.अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून शिक्षक नसल्याने आता गरीब मुलांनी शिक्षणासाठी जावे कुठे?असा प्रश्न पालकांना पडला आहे. कृषी विभाग मनमानीने वागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे.जिल्हा परिषदे व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्याला आणखीन किती काळ वाट पाहावी लागणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून निवडणूक विभागाने याची तत्काळ दखल घेउन विधान सभेच्या निवडणुका पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात याव्या अशी मागणी जनतेतून होत आहे.