सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बुद्रूक येथील ग्रामपंचायतच्या रोजगार सेवकाला गोठ्याकरिता शेतकऱ्याकडून 5000/- रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उमरखेड येथे ही कारवाई केली.
गजानन बद्रीसिंग रत्ने (51) असे या ग्रामरोजगार सेवकाचे नाव असून, तो ग्रामपंचायत बिटरगाव बु. येथे कर्तव्यावर आहे. तक्रारदाराने 8 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लेखी तक्रारी वरून सोमवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता ग्राम रोजगार सेवक गजानन बद्रीसिंग रत्ने याने तक्रारदार यांच्या वडिलांकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना अंतर्गत ग्राम मन्याळी ता. उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळण्याकरिता केलेला अर्ज मंजूर करण्याकरिता 7000/- रूपये लाचेची मागणी केली. तसेच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यावरून सोमवारी सापळा रुचून हनुमान मंदिर प्रवासी थांबाच्या समोर उमरखेड ढाणकी बिटरगाव रोड, येथे लाच घेताना आरोपीला अटक केली. सदरची कारवाई गजानन जगताप माननीय पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ येथील पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ उत्तम नामवाडे यांनी व त्यांच्या टिमने केली.
ग्रामरोजगार सेवक लाचेच्या जाळ्यात अडकला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2024
Rating: