सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पांढरकवडा : झरी, केळापूर तालुक्यातील बिगर सातबारा शेतकरी महिला पुरूषांनी सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा अहवाल बोलावून सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल पटवारी यांच्या मार्फत सादर करण्याचे निर्देश द्या, अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने 15 जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून केळापूर उपविभागीय अधिकारी यांना दिला.
पुढें निवेदनात नमूद केले आहे की, दलीत, आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती साठी कब्जा केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून सन 2023 च्या खरिप हंगामात झरी तालुक्यातील मौजे रायपूर, दूर्भा, परसोडी, कमळवेली, देमाडदेवी, कोपामांडवी, रजनी, अर्धवण, उमरी सत्तपल्ली तसेच केळापूर तालुक्यातील मौजे पिंपरी बोरी, सुन्ना, वाऱ्हा कवठा, अडाणी, मुंजाला, सहित इतरही गावातील लोकानी पेरणी केलेल्या बाबत लेखी स्वरूपात मागणी केलेली असताना अहवाल सादर करण्यासाठी टाळाटाळ केली आहे. म्हणून पेरणी केलेली असताना पटवारी यांनी अहवाल सादर केला नसल्याचा आरोप निवेदनातून केला असुन मागील वर्षांच्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल पटवारी यांच्या मार्फत बोलावून यावर्षीचा अहवाल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे पटवारी यानी पंचनामे, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मौका पाहणी, करून पेरणी केलेल्या शेतकऱ्याच्या बायानाप्रमाणे वाहिती क्षेत्र फळासहित अहवाल सादर करण्याचे निर्देश द्या अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला.
यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उर्कुडा गेडाम, सौ. इंदिरा बोंदरे, पुरुषोतम कोडपे, रामचंद्र मडावी, दिलीप मडावी, गंगांना रेड्डी, लक्ष्मण आत्राम, वासुदेव टेकाम, सहित बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या असंख्य महिला पुरुष उपस्थित होत्या.
बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे केळापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2024
Rating: