सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
निवेदनातून दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खतांची आर्थिक मदत तातडीने जाहिर करावी, मागील वर्षीचा पिक विमा सरसकट देण्यात यावा, गेल्या वर्षी वर्धा नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या ११ गावांना वेगळी मदत देण्यात यावीत, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावीत, शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा,जर विद्युत पुरवठा केला नाही तर संपुर्ण कोल माईन्स बंद करण्यात येईल, घरगुती गॅसचे दर कमी करण्यात यावेत, घरगुती विजेचे प्रति युनिट दर कमी करण्यात यावेत, वन्यप्राण्यांचा हौदोस थांबवून शेतपिकांचे संरक्षण करण्यात यावेत, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील शहरी व ग्रामीण लाभार्थ्यांना ३ लाख रु. अनुदान करण्यात यावे. वाढ करून ते नियमित देण्यात यावेत, निराधार अनुदानात, पावसाळा सुरु झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात पुरेसा औषध साठा, रेबिज, स्नेक बाईट लस उपलब्ध ठेवण्यात याव्यात.तसेच लॅब टेक्निशियन, डेंटिस्ट (दंत रोग तज्ञ) व एक्स रे मशिन त्वरीत उपलब्ध करण्यात यावीत, घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन देण्यात यावीत, मारेगांव येथील बस स्थानकाचे काम तातडीने सुरु करण्यात यावेत, क्रिडा संकुल उपलब्ध करण्यात यावेत, वणी मारेगाव झरी तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना त्वरीत पिक कर्ज देण्यात यावेत.अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने तालुक्यातील विविध मागण्या घेऊन मारेगाव येथील नगर पंचायत च्या प्रांगणातून मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी शिवसेनाचे सुनील कातकडे, संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, तालुका प्रमुख संजय आवारी, सुनील गेडाम,राजु मोरे, जीवन काळे, यांच्या सह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.
शिवसेनेचा मशाल मोर्चा तहसीलवर धडकला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2024
Rating: